मोर्शी – वरुड करिता ठक्करबाप्पा चे १ कोटी ३० लक्ष ३० हजार मंजूर- आ. डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नांना यश

0
729
Google search engine
Google search engine

अमरावती/वरुड :-

महाराष्ट्र शासनाने वरुड मोर्शी तालुक्यातील आदिवासी भागात ठक्करबाप्पा योजनेअंतर्गत १ कोटी ३० लक्ष ३० हजार मंजूर करण्यात दिले. यामध्ये आदिवासी गावांचा समावेश आहे. आ. डॉ. अनिल बोंडे यांनी या निधी करिता महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले..

यामध्ये मोर्शी तालुक्यासाठी ४० लक्ष ९१ हजार तर वरुड तालुक्यासाठी ८९ लक्ष ३९ हजार रुपये मंजूर झाले आहे.

1. दह्सुर ता. मोर्शी येथे डांबरी रोड पासून ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता बांधकाम करणे. – ७ लाख ५० हजार

2. घोडदेव ता. मोर्शी येथे संतोष मारस्कोल्हे ते पुरण कुंभरे यांचे घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम करणे – १२ लक्ष ५० हजार

3. भिवकुंडी ता. मोर्शी येथे तुळशीदास जवंजाळकर ते श्यामराव धुर्वे यांचे घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम करणे – १० लक्ष ५० हजार

4. तळणी ता. मोर्शी येथे आदिवासी वस्तीत सांस्कृतिक भवन बांधकाम करणे- ७ लक्ष ५० हजार

5. शिरलस ता. मोर्शी येथे आदिवासी वस्तीत हाय मास्क व फ्लड लाईट बसविणे – २ लक्ष ९९ हजार

6. कारली ता. वरुड येथे धनराज सिरसाम ते हातपंपापर्यंत रस्ता खडीकरण व कॉंक्रीटीकारण करणे – ७ लक्ष ५० हजार

7. पळ्सोना ता. वरुड येथे मोतीराम युवानते ते मांगोना रोडच्या पुलापर्यंत घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम करणे – ७ लक्ष ५० हजार

8. कुमुंदरा ता. वरुड येथे जि. प. शाळेपासून ते प्रवीण परतेती यांचे घरापर्यंत घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे – ७ लक्ष ५० हजार

9. करवार ता. वरुड येथे परसराम कंगाले ते संतोष गजाम यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ७ लक्ष ५० हजार

10. माणिकपूर ता. वरुड येथे झामू कुंदासिंगे ते जि. प. शाळेपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे – ७ लक्ष ५० हजार

11. पंढरी ता. वरुड येथे शंकर युवानते ते मुन्ना अमजीरे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ७ लक्ष ५० हजार

12. वाई खुर्द ता. वरुड येथे फ्लड लाईट बसविणे – २ लक्ष ९९ हजार

13. जामतळ(भवानी डोह) ता वरुड हाय मास्क व फ्लड लाईट बसविणे – २ लक्ष ९९ हजार

14. रवाळा ता. वरुड येथे सभागृह बांधकाम करणे – १३ लक्ष ४१ हजार

15. कारली ता. वरुड येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे – ७ लक्ष ५० हजार

16. जामतळ(भवानी डोह) ता वरुड येथे आदिवासी भवन बांधकाम करणे – ७ लक्ष ५० हजार

17. भेम्बडी मोठी ता. वरुड येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे – १० लक्ष