कडेगाव पलुस विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी मंत्री स्व. डॉ.पतंगराव कदम यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Google search engine
Google search engine

महाराष्ट्रेचे माजीमंत्री व जेष्ठ कॉंग्रेसनेते स्व.आमदार डॉ.पतंगराव कदम यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी सांगली जिल्ह्यातील वांगी तालुका कडेगाव येथील डॉ.पतंगराव कदम सोनहीरा कारखाना परिसरातील स्मारक स्थळी कदम कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्त्यांची अलोट गर्दी जमली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्रासह पुणे ,मुंबई व राज्याच्या विविध भागातील मान्यवर व हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्यास आदरांजली वाहिली यावेळी आठवणींचा महापूर दाटून आला व अनेकांना अश्रू अनावर झाले .कार्यकर्त्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन स्मारकस्थळी मोठा मंडप उभारण्यात आला होता. ह.भ.प .रामकृष्ण महाराज दादा वसंतगडकर यांच्या समूहाने किर्तनसेवा दिली . यावेळी आमदार मोहनराव कदम ,भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम ,भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम ,आमदार डॉ विश्वजित कदम ,सोनहीरा कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम ,जयसिंगराव कदम ,आत्माराम कदम ,भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम ,सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम ,विजयसिंह कदम ,युवा नेते डॉ.जितेश कदम ,जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड ,डॉ.राजेंद्र जगताप ,डॉ.सौ.अस्मिता जगताप ,पुण्याचे नगरसेवक चंदू शेठ कदम , सागर कदम ,सौ .भारती लाड ,जिल्हा परिषद सदस्या सौ .वैशालिताई कदम , दिग्विजय कदम ,हर्षवर्धन कदम, सोनहीरा कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांच्यासह कदम कुटुंबीयांनी प्रारंभी समाधीचे दर्शन घेतले.त्यानंतर माजी मंत्री आमदार सतेज पाटील ,आमदार आनंदराव पाटील ,आमदार अनिल बाबर ,माजी केद्रीय मंत्री प्रतीक पाटील ,सांगलीच्या जयश्रीताई पाटील , माजी आमदार सदाशिव पाटील ,वनश्री नानासाहेब महाडिक ,विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील ,मनमंदिर बँकेचे अध्यक्ष अशोक गायकवाड ,जेष्ठ नेते आनंदराव मोहिते , ,पृथ्वीराज पाटील ,भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते ,सी.बी .पाटील,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते ,खानापूरचे माजी सभापती रामराव दादा पाटील ,प्रतापराव साळुंखे ,पी .टी.मधाळे,वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.सुस्मिता जाधव ,भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह के डी जाधव, उत्कर्ष खाडे ,इंद्रजित साळुंखे , पंचायत समिती सदस्य विकास पवार .सोनहीरा संचालक दिलीपराव सुर्यंवशी,पी सी जाधव ,पंढरीनाथ घाडगे ,संभाजी जगताप, माजी जिल्हा परीषद सदस्य सुरेश मोहीते,डाॅ. विजय होनमाने, बाबासो सूर्यवंशी, प्रशांत मोहिते ,राजेंद्र पवार ,भारती विद्यापीठ सोनहीरा कारखाना ,सागरेश्वर व कृष्णा वेरळा सूतगिरणी आदी संस्थाचे पदाधिकारी ,संचालक ,कर्मचारी , काँग्रेससह सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पलूस कडेगाव मतदार संघ व जिल्हा आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांनी डॉ.पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले व त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले .