मंत्री राम शिंदे यांच्या कडे मुस्लिम ओबीसींसाठी वेळ नाही का ? – शब्बीर अन्सारी

0
726
Google search engine
Google search engine

ऑल इंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा संतप्त सवाल

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – मुस्लिम ओबीसी समाजाचे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सोडविण्याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा ओबीसी मंत्री प्रा. राम शिंदे यांना वेळ नाही का ? असा संतप्त सवाल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग. चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी अन्सारी म्हणाले की, आम्ही गेली 40 – 45 वर्ष मुस्लिम समाजासाठी काम करतोय. असे मंत्री आम्हाला कोणत्याच सरकार मध्ये भेटले नाही. आमच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर माझ्या निर्देशानुसार दि. 27/06/2018 रोजी इतर मागासवर्गीय मुस्लिम समाजाच्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र तथा वैधता प्रमाणपत्रामध्ये येणाऱ्या अडचणी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याबाबत आमच्या संघटनेचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी निवेदन दिले होते. त्यांच्या अनुषंगाने पुन्हा दि.26/11/20018 रोजी निवेदन दिले. त्याबाबत त्यांनी याचा पाठपुरावा केला असता. मंत्री राम शिंदे यांनी एकच प्रकरणावर एका मंत्र्याला किती वेळा भेटायचे ? असा सवाल उपस्थित केला. याचा अर्थ असा मंत्री महोदय हे फक्त नावाला मंत्री आहेत. यांना जनतेच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नाही. आम्ही मुस्लिम आहोत. म्हणून आम्हाला वेळ देण्यास टाळाटाळ केली जात आहे असा आरोप अन्सारी यांनी केला. येणाऱ्या काळात ओबीसी समाज सरकार आपले सरकार आणेल असा दावा अन्सारी यांनी केला.

यावेळी संघटनेचे मंत्रालयीन सचिव मुलाणी म्हणाले की, जर मंत्री महोदय आम्हाला वेळ देऊ शकत नसतील तर ते आमचा प्रश्न काय सोडविणार ? पण आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर पूर्ण विश्वास आहे. याबाबत ते गंभीर दखल घेतील व मुस्लिम समाजाला न्याय मिळावा म्हणून योग्य ती कार्यवाही करतील.