अधिक मास व मकरसंक्रांति निमित्य जिल्यात प्रथमच श्री क्षेत्र शिराळा ते गंगासागर वारी सोहळा

0
872
Google search engine
Google search engine

अमरावती :- “सारे तीरथ बार-बार, गंगा सागर एक बार” अधिक मास व मकरसंक्रांति निमित्य श्री क्षेत्र शिराळा ते गंगासागर वारीचे प्रस्थान येत्या शुक्रवारी ११ तारखेला बडनेरा येथून होणार आहे.

   गंगेचा प्रवाह जिथे बंगालच्या उपसागरास मिळतो त्या ठिकाणाला धार्मिक महत्व आहे. गंगा सागराचा हा संगम “पवित्र संगम” म्हणून प्रसिद्ध पावला आहे. बंगाली पौष महिन्यातला हा शेवटचा दिवस, म्हणजेच मकर संक्रांत, या दिवशी सूर्य मकरवृत्तातून भ्रमण करतो म्हणून त्या दिवसाला विशेष महत्व आहे. त्या दिवशी देशभरातून, शेजारी देशातून साधू-संत, तपस्वी, धार्मिक गुरु, श्रद्धाळू लोक आणि पर्यटक असे सगळेच इथे गर्दी करतात. संगमाच्या ठिकाणाला अगदी मेळ्याचे स्वरूप प्राप्त होते. हा मेळा एकच दिवसाचा असतो. त्या दिवशी माणसांनी फुलून गेलेला सागर किनारा दुसऱ्या दिवशी मात्र पूर्ण रिकामा असतो. राज्य सरकार आणि स्थानीक प्रशासनातर्फे देशभरातून येणाऱ्या पर्यटक / भाविकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, जेवण याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो. उन / वारा आणि बंगालचा बेभरवशी पाऊस हे सगळे लक्षात घेता, थोडीफार आसर्‍याची पण सोय केली जाते. परंतु येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड असल्याने व्यवस्थेवर ताण येऊन बरेचदा ती कोलमडतेच असे ऐकले. पण भारत देशाचे ‘” एकात्मता गीत “, मिले सूर मेरा तुम्हारा “याची देही याची डोळा” प्रत्यक्ष अनुभवायचे असल्यास हे स्थान, हा दिवस चुकवू नये असे म्हणतात

(कपिलमुनींचे मंदिर)

   यावर्षी अमरावती जिल्ह्यात प्रथमच अधिक मास व मकरसंक्रांति निमित्य श्री क्षेत्र शिराळा ते गंगासागर वारीचे प्रस्थान येत्या शुक्रवारी ११ तारखेला बडनेरा येथून होणार आहे. गंगासागर येथे रविवारी गंगासागर स्नान भ. कपिलमुनी आश्रम येथे भेट देण्यात येईल तसेच नागासाधू पूजन व दर्शनाच्या सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याच दिवशी सोपान महाराज सरोदे यांचे प्रवचन देखील ठेवण्यात आलेले आहे.५ दिवसीय वारीचा समारोप १७ तारखेला बडनेरा येथे श्री विलासराव शेलोरकर , टिळक कॉलोनी जुनिवस्ती येथे होणार आहे अशी माहिती वारीचे आयोजक व संचालक हभप श्री प्रभुजी मदनकर महाराज यांनी दिली आहे. सदर वारीत सहकारी मंडळीमध्ये चि.गोकुळदास मदनकर, श्री श्यामसुंदर देशमुख,श्री संजय देवहाते, श्री अरुणराव पोहनकर, जनार्धनराव गभणे ,रमेशराव विघे,दत्ताभाऊ तायडे, श्री गणेशराव साठवणे इत्यादींचा समावेश आहे.