परंडा शहरात दरोड्याने खळबळ ; घटना सी सी टिव्हीत कँमेर्यात कैद

598

परंडा शहरात दरोड्याने खळबळ ; घटना सी सी टिव्हीत कँमेर्यात कैद

परंडा : प्रतिनिधी : परंडा शहरातील मुख्यबाजार पेठेतील वर्धमान ज्वेलर्स दुकानात बुधवार (दि 9) च्या मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास दरोडेखोरांनी सोने चांदी चे दागीने लंपास केल आहे या घटनेमुळे शहरातील व्यापारी व नागरीका मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे परंडा शहरातील मुख्य बाजार पेठेतील मयूर मनोज बेदमुथा यांचे वर्धमान ज्वेलर्स या नावाने सोन्या चांदीचे दुकान आहे या दुकानात मध्यरात्री अज्ञात चोरट्याकडून चोरी झाली आहे त्या दुकानातील सिसिटिव्ही कॅमेरा हा मनोज बेदमुथा यांचा मुलगा मयूर बेदमुथा यांच्या मोबाईलला जोडला गेला असल्याने सदर चोरीची माहीती परंडा पोलीस स्टेशनला देण्यात आली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले असता दरोडेखोर पसार झाल्याचे लक्षात आले या घटनेमुळे शहरातील सोनाऱ्याच्या दुकानातील शस्त्रधारी दरोडा पडल्याने शहरातील व्यापारी व नागरीका मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी प्रशासना कडून सकाळी ११ वाजे पर्यंत पंचनामा करण्यात आला
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील मंडई पेठेतील मुख्य बाजारपेठेत बेदमुथा बंधुंचे वर्धमान ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान आहे. बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सात ते आठ सशस्त्र चोरटे दुचाकी ढकलत दुकानाजवळ आले. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत दुकानातील साहित्याची लुट केली. चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. नेमकी किती रूपयांची चोरी झाली, हे अद्याप समजले नाही. पोलिस सकाळपासूनच घटनास्थळी दाखल झाले आहेत. सकाळी आठ वाजता परंडा पोलिसांसह उस्मानाबाद येथील ठसे तज्ज्ञ पथक दाखल झाले असून, दुकानातील पंचनामा करण्यात येत आहे. घटनास्थळी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील मुख्य बाजारपेठेतील या प्रकारामुळे व्यापाऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील याच बाजारपेठेतील दुकानांसमोर रात्री लिंबु, सुया टाकून भिती निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे. हा प्रकारही सिसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।