मोगरा येथे घराला आग लागुन ५० हजाराचे नुकसान – सुदैवाने जीवीतहाणी नाही

171
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड जवळील मोगरा येथील एका वृध्द महिलेच्या घराला आग लागुन ५० हजाराचे नुकसान झाल्याची घटना ९ जानेवारीच्या मध्यरात्री ३.३० वाजता घडली.
मोगरा गावठानमधील वार्ड नं. २ मधील घर क्र. ६८ मध्ये राहणाऱ्या श्रीमती द्रोपदीबाई देवरावजी चव्हाण (वय ८५ वर्ष) यांच्य मालकीच्या घराला ९ जानेवारीच्या मध्यरात्री ३.३० वाजता आकस्मीकपणे आग लागली. त्याचवेळी ३.३० वाजताच्या सुमारास राहुल कचवे हे शेतात जायला निघाले असता त्यांना घराला आग लागलेली दिसली. तेव्हा त्यांनी आरडाओरडा करुन गावकरी यांना उठवीले व सुरूवातीला द्रोपदीबाईला घरातुन बाहेर काढले व नंतर आग विझवीली. मात्र या आगीमध्ये अन्नधान्य व गृहपयोगी वस्तु खाक होऊन अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये जीवीतहाणी झाली नाही. तसेच यामध्ये त्यांच्या घराला लागुन असलेल्या प्रमोद वासनिक यांच्या घरावरील लाकडी इमला सुध्दा जळून खाक झाले. दोन्ही घरांचा पंचनामा तलाठी यांनी करून तहसिलदारांना सादर केला.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।