सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती मजबुत: बॅंकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील

0
1451
Google search engine
Google search engine

.शेतकऱ्यांच्या स्थैर्यासाठी शेतकरी आरोग्य विमा सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. सहकारी संस्थेचा कारभार करताना सभासदांचा विश्वास महत्वाचा असतो. ज्या संचालकांवर सभासदांचा विश्वास असतो ती संस्था प्रगतीपथावर राहते. जिल्ह्यातील शेतकरी व सहकारी सोसायटीच्या सहकार्याने बॅक प्रगती करीत आहे असे प्रतिपादन बॅंकेचे चेअरमन दिलीप तात्या पाटील यांनी केले.कडेपूर ता. कडेगांव येथील राजवीर मल्टीपर्पज हाॅल येथे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बॅक लि. सांगलीचा कडेगांव तालुका ग्राहक मेळावा संपन्न झाला. यावेळी चेअरमन दिलीप तात्या पाटील, व्हाईस चेअरमन संग्रामसिंह देशमुख, सौ. श्रध्दा चरापले, तज्ञ संचालक किरण लाड, अँड. चिमण डांगे, सुरेशभाऊ पाटील, सौ. कमल पाटील, दिनकर पाटील प्रभारी मुख्य कार्यकारी संचालक बी. एम. रामदुर्ग हे प्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना दिलीप पाटील पुढे म्हणाले की, सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बॅकेची आर्थीक स्थिती मजबूत आहे परंतू जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस बिले न दिल्यामुळे शेतकर्‍याची थकबाकी वाढत आहे यावर तोडगा काढण्यासाठी कारखाना प्रतिनिधींची बैठक घेवून मार्ग काढला जाईल त्यामुळे बॅकेची वसूली होईल. बॅंकेच्या स्थैर्यासाठी कर्जाची वसूली व ठेवी वाढवणेसाठी सहकार्य करावे.यावेळी व्हाईस चेअरमन श्री. संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, सांगली जिल्हा बॅक राज्यातील ज्या तीन मध्यवर्ती बॅका आघाडीच्या आहेत त्यामध्ये आपल्या बॅकेचा समावेश आहे याचा आम्हा सर्व संचालकांना अभिमान आहे. प्रशासकीय कार्यकाळ नंतर अनेक अव्हानांचा सामना करावा लागला व सद्या बॅकेची स्थिती चांगली आहे याचे सर्वश्रेय चेअरमन संचालक मंडळाला आहे. बॅक सामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यास बांधील आहे.स्वागत बॅंकेचे सरव्यवस्थापक बी. एम. पाटील यांनी केले. तरयावेळी दत्तात्रय सुर्यवंशी, अॅड. शांता कनुंजे, मंगल क्षिरसागर कुंडलिक एडके, रविंद्र कांबळे, रविंद्र ठोंबरे, आशिष घार्गे, कडेपूर चे सरपंच रूपाली यादव, अपर्णा देशमुख, चंद्रसेन देशमुख, विलासराव अभंग, शंकरराव पाटील, सोनहिरा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पी. सी. जाधव,सुत्रसंचलन श्री विजय कडणे यांनी केले तर आभार श्री. एस. एम. काटे यांनी मानले.