खोटे कागदपत्रे करुन जागा हडप प्रकरण ; परंडा नगराध्यक्षांचा मागवला जिल्हाधिकारी यांनी आहवाल

619

परंडा नगराध्यक्षांचा जिल्हाधिकार्यांनी मागवला तात्काळ अहवाल

उस्मानाबाद – परंडा येथील नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर करून खोटा झोन दाखला तयार करून जागा हाडप केल्याप्रकणी मनसेच्या उस्मानाबाद महिला आघाडिच्या जिल्हाअध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी २४/१२/२०१८ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात जिल्हाधिकारी यांनी परंडा येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना ता १०/१/२०१९ रोजी तात्काळ नोटीस बजावली आहे. नोटिसमध्ये मौजे परंडा येथील सर्वे नं २३४/ ब हि जागा शासकिय आरक्षित केली आसताना सदर जागा नगर विकास विभाग यांनी आरक्षित केलेली आहे असे आसताना नगर परिषद परंडा येथिल कर्मचारी तसेच नगराध्यक्ष ,मुख्याधिकारी यांनी बनावट खोटे कागदपत्रे तयार करून नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर केला आहे.म्हणुन सदरील व्यक्तीवर योग्य ती फौजदारी कार्यवाही करुन गुन्हा दाखल करावा,व नगराध्यक्ष यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे.अशी तक्रार मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हाअध्यक्ष वैशाली गायकवाड यांनी तक्रार केली आहे .त्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अभिप्राय तात्काळ जिल्हाधिकारी यांनी मागवला आहे. त्यामुळे आता पून्हा परंड्यात राजकिय चर्चेला उधाण आले आहे.हे खरे आहेच पण पुढे आहवालात मुख्याधिकारी नेमका काय उल्लेख करणार ? असा प्रश्न उपस्थीत होत आसून सध्या या प्रकरणाकडे मोठ्या राजकिय दिग्गजांचे डोळे लागले आहेत .परंतू त्या दिग्गज नेत्यांचेही पूरावे वैशाली गायकवाड यांच्या हाती लागल्यामुळे लवकरच त्या दिग्गज नेत्यांनी केलेल्या कारनाम्याचे पितळ उघडे पडणार आसल्याचीही दबक्या अवाजात चर्चा एकायला मिळत आहे.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।