राजमाता जिजाऊ, विवेकानंद जयंती निमित व्याख्यान, पत्रकारांचा सत्कार

154

राजमाता जिजाऊ, विवेकानंद जयंती निमित व्याख्यान, पत्रकारांचा सत्कार

येडशी – येथील जनता विदयालयात शनिवारी ( दि. १२ ) राजमाता जिजाऊ व विवेकानंद जयंती निमित व्याख्यान व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापिका ज्योती दिनकर डोळस यांचे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर तर कु. प्रियंका भगवान जाधवर हीचे राजमाता जिजाउ बाबत व्याख्यान झाले. यानिमित्ताने येथील स्थानिक पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विदयार्थाचा गुणगौरव करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रशालेच्या प्राचार्या एम.एल. इटेवाड मॅडम यांना शिक्षण महर्षी वसंतराव काळे शिक्षण सेवा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार बांधवाच्या वतीने त्यांचा प्रतिमा देउन गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकार सल्लाउद्दीन शेख, दत्ता पवार, अर्जुन सुतार, आमीर शेख, रफिक पटेल, संतोष खुणे, महादेव सस्ते, सेवानिवृत शिक्षक धोंडीराम करंजकर, प्रा.डी.डी मस्के आदींसह शिक्षक -शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विद्या देशमुख, किरण जगदाळे यांनी तर आभार योगेश उपळकर यांनी व्यक्त केलेे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।