विवाह सोहळ्यातील विडंबन थांबविले पाहीजे! -महादेवराव भुईभार

209

मध्यस्थी वार्षिकांकाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन

आकोटः-
समाजातील विवाह विषयक अनिष्ट रुढी परंपरा तथा अवडंबर बाजुला ठेवून समाजाने नवा आदर्श निर्माण करावा.हिच खरी गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराजांना आदरांजली ठरेल
असा हितोपदेश शेतकरी नेते तथा समाज प्रबोधनकार महादेवराव भुईभार यांनी केला.
श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे आयोजित *मध्यस्थी* वधूवर परिचयाच्या वार्षिकांकाच्या प्रकाशन समारंभात महादेवराव भुईभार बोलत होते
आ प्रकाशराव भारसाकडे यांचे हस्ते मध्यस्थी वधू-वर परिचय पुस्तिकेच्या सातव्या वार्षिकांकाचे प्रकाशन पार पडले.

श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभाला जेष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगणकर ,जि.प. सदस्य बाळासाहेब बोंद्रे, अशोकराव बिहाडे,सदाशिवराव पोटे,दिलिप हरणे,अनिल कोरपे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

विवाह योग जुळवणे हा विषय अत्यंत कठीण व गुंतागुंतीचा झाला आहे.आणि म्हणून मध्यस्थी मंडळाचे कार्य काळाची गरज झाली आहे. शेतकरी असलेल्या मुलांना वधू शोधणे अवघड झाले आहे.मध्यस्थी मंडळाने पुढाकार घेवून ग्रामिण व शेतकरी उपवर मुलांसाठी विशेष कक्ष सुरु करावा त्यांचा स्वतंत्र मेळावा आयोजित करावा.हे मोठे कार्य पार पाडावे असा मौलिक सल्ला सहकार नेते नानासाहेब हिंगणकर यांनी यावेळी दिला.मध्यस्थी मंडळाचे कार्य अत्यंत निष्काम भावनेने सुरु आहे आणि म्हणूनच ते समाजाच्या विश्वासास पात्र ठरले आहे असे गौरवोद् गार त्यांनी काढले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प वासुदेवराव महल्ले यांनी गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज यांनी गुरुमाऊलीचे आयुष्यभर समाज प्रबोधन केले त्यांचे विवाहविषयक उद्बोधक विचार समाज हिताचे आसल्याचे सांगून संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहीती यावेळी दिली.
मध्यस्थीचे अमरावती विभागीय समन्वयक बाळकृष्ण आमले ,प्राचार्य वसंतराव घीवे यांची समायोचित भाषणे पार पडली.

जयश्री फोकमारे व वृंदाताई मंगळे यांनी जिजाऊ वंदना तर मंडळाचे सदस्य नागोराव वानखडे यांनी मध्यस्थी शिर्षगीताचे गायन केले.

संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वै पंजाबरावजी हिंगणकर ,लोकनेते वै.वसंतराव धोत्रे,मध्यस्थी मंडळाचे सदस्य वै.अंबादासजी होनाळे यांच्या मध्यस्थी मंडळातील ऋणानुबंधाचा उल्लेख करुन त्यांचे पावन स्मृतींना उजाळा दिला.

यावेळी मध्यस्थी मंडळ द्वारा कार्यान्वित आदर्श विवाह केद्रांतर्गत आदर्श विवाह करणा-या नवदाम्पत्यांचा
स्व शांतारामजी गावंडे स्मृति प्रतिष्ठाण बाभुळगांव द्वारा रोख ३१००/-रुपये,
लोकनेते स्व वसंतराव धोत्रे यांचे स्मृतिपित्यर्थ रोख १००१/-रुपये
वै. अंबादासजी महल्ले स्मृतिपित्यर्थ रोख १००१/ रुपये आणि मध्यस्थी मंडळ द्वारा रोख १००१/- रुपये,सदाशिवराव पोटे यांचे कडून ५००/रुपये पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

अतिथींचे स्वागत बाळासाहेब फोकमारे,सुरेशदादा कराळे, जयकृष्ण वाकोडे ,अशोकराव पाचडे,यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे यांनी केले मध्यस्थी वार्षिकांकाचे मुख्य संपादक नंदकिशोर हिंगणकर यांनी संपादकिय मनोगत व्यक्त केले.

मध्यस्थीच्या कार्यात भरीव योगदान दिल्याबद्दल पुणे विभागीय शाखेचे अध्यक्ष इंजि. महादेवराव सावरकर, पुण्याचे उद्योजक मोहन डोंगरे,अमरावती विभागीय समन्वयक बाळकृष्ण आमले,बुलढाणा खांमगांव विभागीय समन्वयक अमृतराव वाघ,
वाशिम कारंजा विभागीय समन्वयक ह.भ.प.विनायकराव गुंजाहे ,
मुर्तिजापूर तालुका समन्वयक ,अजाबराव वहीले,अकोल्याचे डाॕ अमोल रावणकार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला
सुरेशदादा कराळे यांनी सत्कारमुर्तींच्या कार्यावर प्रकाश टाकला.

नेट/सेट परिक्षेत घवघवीत यश मिळविणा-या कु.अश्विनी भालश्चंद्र फोकमारे यांचा विशेष गौरव करण्यात आला.तथा मध्यस्थी वार्षिकांकाचे मुखपृष्ठ व टंकलेखन सुबकतेने करुन दिल्याबद्दल साई ग्राफिक्सचे नवनित गजानन जवंजाळ यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन ज्योतीताई कुकडे यांनी तर आभार जयकृष्ण वाकोडे यांनी मानले.

याप्रसंगी सहकार नेते मोहनराव जायले,बाळासाहेब भांडे,कनक कोटक,मध्यस्थी मंडळाचे प्रा.साहेबराव मंगळे,मधुकरराव पुंडकर,नागोराव कुलट,भास्करराव डिक्कर,नागोराव वानखडे,सुधाकरराव हिंगणकर,, श्रीहरी मंगळे,विनायकराव कुकडे,प्रकाश फुके ,राममुर्ती वालसिंगे मनोज कुलट,ज्ञानदेवराव वनारे,,गजानन महल्ले,बंडू पा.कुलट,
आशाताई गावंडे, मिनाताई अजय अरबट,
धनंजय वाघ,गजानन वालसिंगे,गणेश पांडे,विश्वास पालखडे,विठ्ठलराव मेंढे,माधवराव ताथोड,व मंडळाचे मार्गदर्शक , .समन्वयक,तथा युवक-युवती ,पालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।