स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करा-प्रा.राजा जगताप

0
880

स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करा-प्रा.राजा जगताप

उस्मानाबाद (प्रतिनिधी)दि.१२
श्री.स्वामी विवेकानंद हे शिक्षण घेतानाच त्यांचेवर रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा प्रभाव होता.ते त्यांचे लाडके शिष्य होते.
एका बाजुला आध्यात्म आणि दुस—या बाजुला भारतातील गरिबी,दारिद्र्य,यांची चिंता धर्माचा उपयोग माणसासाठी झाला पाहिजे.धर्माने बंधुभाव जपला पाहिजे ,त्यातूनच माणवांची प्रगती झाली पाहिजे.धर्माने भेदभाव संपवले पाहिजेत हेच स्वामी विवेकानंदाना अभिप्रेत होते.शिकागो सर्वधर्म परिषदेत त्यांनी अमेरीकेतील व जगातील आलेल्या प्रतिनिधिंना त्यांनी भाषणाच्या सुरवातीलाच “भावांनो,बहिणींनो…!” संबोधून जगाला बंधुभाव शिकवला आणि ते जगभर ओळखले जाऊ लागले.आजही त्यांच्या बंधूभावाची देशालाच नव्हे तर जगाला गरज आहे.भारतातील गरिबी,अज्ञान,अंधश्रध्दा यांचे निर्मुलन करायचे असेल तर शिक्षण दिले पाहिजे व उद्योगातून प्रगती केली पाहिजे.अशा महामानवाचे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असे प्रतिपादन
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्री. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती “सप्ताहा”निमित्त १२ जानेवारी ते१९ जानेवारी , आयोजित केलेल्या १२ जानेवारीच्या,व्याख्यानात प्रा.राजा जगताप (मराठी विभाग प्रमुख)यांनी केले आहे.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते.यावेळी प्रा.डी.एम.शिंदे,डाॅ.केशवराव क्षीरसागर,डाॅ.विकास सरनाईक मान्यवरांनी स्वामी विवेकानंद डाॅ.बापूजी साळुंखे,राजमाता जिजाऊ,संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे प्रतिमाचे पुजन केले.पुढे बोलतांना प्रा.जगताप म्हणाले की,स्वामी विवेकानंद यांची आश्रम,मठ,संन्यासी या संदर्भातील भूमिका खूप व्यापक आहे.मठातील आपल्या शिष्याकडून समाजातील गरिबी,दारिद्र्य,भेदाभेद याचा नायनाट झाला पाहिजे.मानवतावाद जपला पाहिजे,आपल्या धर्माच्या माध्यमातून सर्वांगीन विकास झाला पाहिजे .या भावणेतूनच त्यांनी भारतभर प्रवास केला आहे.त्यावेळी त्यांचे विचाराला समर्थन म्हणून खेतडी,म्हैसूर,मद्रास चे राजे ,नरेश यांनी व हैद्राबादचे निजाम बाबर खुर्शिद यांनी सहकार्य केले आहे.स्वामी विवेकानंदानी भारता बरोबरच न्युर्यार्कमध्ये विविध ठिकाणी व्याख्यानातून धर्म व मानवता,जगातील बंधुभाव,जगातील गरिबी निर्मुलनावर विचार मांडले होते.ते मानवतावादी विचारच आपणास प्रगती पथावर आणू शकतात .त्यासाठीच आजच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार समजाऊन घेऊन आत्मसात करावेत असे आवाहन केले आहे .
अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,आज स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे.छञपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य स्थापनेत राजमाता जिजाऊ यांचे अफाट योगदान आहे.त्यांचेमुळेच छञपती शिवाजी राजे यांनी स्वराज्यातील रयतेला न्यायाने वागवले.स्वामी विवेकानंद यांचे विचाराला पुढे नेहण्यासाठीच शिक्षणमहर्षी डाॅ.बापुजी साळुंखे यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन करून गोर,गरिब समाजातील बांधवांना शिक्षण देऊन प्रगती पथावर आणले आहे.महापुरूष व महामाता यांचे जयंती दिनी विद्यार्थ्यांनी त्यांचेविचार अंगिकारावेत .
सूञसंचालन डाॅ.केशव क्षीरसागर यांनी केले.यावेळी प्रा.डाॅ.विकास सरनाईक यांनी “राजमाता जिजाऊ यांचे छञपती शिवाजी महाराज यांचे कार्यातील योगदान ” या विषयावर विचार व्यक्त केले.प्रा.डी.एम.शिंदे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रा.सौ.डाॅ.महाडिक,प्रा.सौ.स्वाती बैनवाड,डाॅ.नितीन गायकवाड,प्रा.सौ.जाधव,प्रा.नागरगोजे,प्रा.हंगरगेकर उपस्थितहोते.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रा.माधव उगीले यांनी मानले