युवक काँग्रेसचे जिल्हा प्रशासनाला 7 दिवसाच्या अलतिमेट,कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलन करू :-विकास सोनार

0
797
Google search engine
Google search engine

युवक काँग्रेसचे जिल्हा प्रशासनाला 7 दिवसाच्या अलतिमेट,कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलन करू :-विकास सोनार

चांदुर बाजार :-

दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले 353 क्रमांक च्या राष्ट्रीय महामार्ग च्या एच जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी च्या मनमानी विरोधात आता युवक काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांनी अमरावती जिल्हा प्रशासन त्याच्यावर कार्यवाही साठी सात दिवसाच्या अलतिमेन्ट दिला आहे.
353 क्रमांकाच्या रोडच्या बांधकाम मध्ये मोठ्या प्रमाणावर निकृष्ट पणा,  पिवळ्या मातीचा अति जास्त प्रमाणात वापर तसेच रोडच्या मध्यभागी जागा सोडून अपूर्ण बांधकाममूळे अपघाताची संख्या वाढली आहे.तसेच पर्यावरणीय बाबीची कोणतीच पुर्तता होत नसल्याने कंपनी वर कार्यवाही करण्यासंबंधी चे निवेदन अचलपूर मतदार संघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास सोनार यांनी जिल्हाधिकारी अमरावती याना दिले आहे.
त्यांनी आपल्या निवेदन मध्ये जर सात दिवसाच्या आता एच जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी वर कार्यवाही झाली नाही तर अचलपूर मतदार संघात युवक काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करणार असल्याचे जिल्हा प्रशासन याना कळविले आहे.मात्र मागील काही काळापासून होत असलेल्या वेगवान वाहतूक वर चांदुर बाजार पोलिस आणि महसूल विभाग सुद्धा काहीच कार्यवाही करीत नसल्याने प्रशासन याचा या कंपनीला पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.

मोर्शी -चांदुर बाजार -परतवाडा-अचलपूर या मार्गावर 353 क्रमांकाच्या रोडच्या बांधकाम सुरू आहे.मात्र रोडवर खाली पडत असलेली सीमेतमिश्रत गिट्टी मुळे अपघात संख्या वाढत आहे.त्याचप्रमाणे रोडवर ज्या ठिकाणी बांधकाम पूर्ण व्हायचे आहे त्या ठिकाणी पाणी टाकले जात नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.त्यामुळे रोडच्या बाजूला असलेल्या पांढरा कापूस हा काळा होत आहे,संत्रा झाडावर सुद्धा याचा परिणाम होत आहे.त्याच्यप्रमाणे नागरिकांच्या आरोग्यस सुध्दा मोठ्या प्रमाणावर धोका पोहचत आहे.चांदुर बाजार शहराच्या बाहेर जाण्याकरिता एकच मुख्य मार्ग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणवर वाहतूक असते मात्र कोणत्याही बाबींची पूर्तता न करता एच जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आपले वाहन वेगवान गतीचे चालवितात.या सर्वांवर कार्यवाही साठी युवक काँग्रेस आता रस्त्यावर उतरणार आहे.

बॉक्समध्ये
“वेगवान वाहतुक आणि पर्यावरनिय बाबीची पूर्तता न केली जात असल्यामुळे चांदुर बाजार पोलिसांनी यांवर कार्यवाही करायला पाहिजे होते मात्र कोणतीच कार्यवाही होत नसल्याने त्याचे या कंपनीला मूक संमती असल्याचे दिसत आहे.त्याचप्रमाणे महसूल विभाग सुद्धा या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने या मध्ये आर्थिक व्यवहार झाला असल्याचे बोलले जात आहे.”

प्रतिक्रिया
353 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्ग चे अचलपूर मतदार संघात काम सुरू आहे.मात्र कामात निकृष्टपणा होत असल्याने त्याची टिकून कसा राहतील हा प्रश्न आहे तसेच कंपनीच्या मनमानी विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.आम्ही जिल्हा प्रशासन याना 7 दिवसात कार्यवाही करण्याबाबत चे निवेदन दिले आहे कार्यवाही झाली नाही तर आमच्या पद्धतीने आंदोलन करू.
1)विकास सोनार युवक काँग्रेस अध्यक्ष अचलपूर मतदार संघ