नरखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घेतले निसर्ग व जलसंधारणाचे धडे ! नरखेड तालुक्यात भरली विद्यार्थ्यांची  ‘धमाल शाळा’ ! पाणी फाउंडेशनचा १४ शाळांमध्ये प्रेरणादायी उपक्रम सुरू !

0
1570
Google search engine
Google search engine

नरखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घेतले निसर्ग व जलसंधारणाचे धडे !

नरखेड तालुक्यात भरली विद्यार्थ्यांची ‘धमाल शाळा’ !

पाणी फाउंडेशनचा १४ शाळांमध्ये प्रेरणादायी उपक्रम सुरू !

विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्यासाठी खेळीमेळीच्या वातावरणात जनजागृती !

नरखेड तालुका प्रतिनिधी :

महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी पानी फाऊंडेशनचे काम सुरू असून महाराष्ट्रात ७६ तालुक्यामध्ये लोकसहभाग, गावकरी , शासन, विविध संघटना, विविध व्यक्ती, एनजीओ, प्रसार माध्यमे यांच्या प्रयत्नातून राज्यातील गावे पाणीदार होत आहेत. यामधून अनेक यशोगाथा निर्माण होत आहेत , नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामध्ये सुद्धा पानी फाऊंडेशन काम करीत आहे सादर कामाची व्याप्ती अधिकाधिक वाढत असून पाणी फाऊंडेशन आता विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबाबत जागृती वाढावी तसेच त्यांच्यामध्ये जलसंवर्धन, निसर्ग आदी बाबत मूल्यवर्धित संस्कार व्हावा याकरिता नरखेड तालुक्यातील १४ शाळांमध्ये गाणी, व्हिडिओ फिल्म,खेळ यांचे माध्यमातून निसर्गाची धमाल शाळा हा उपक्रम राबवित आहे . यामध्ये ७ वी ते ९ वी चे विध्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले आहे . याबाबत शासन परिपत्रक व शाळा निवड करण्यात आल्या आहेत या उपक्रमाचा शुभारंभ नरखेड तालुक्यातील शाळेमध्ये सुरू झाला आहे . नरखेड तालुक्यातील १४ शाळांमध्ये चार दिवसांमध्ये प्रत्येकी ४ तासिका होणार असून याकरिता पानी फाऊंडेशन चे सामाजिक प्रशिक्षक विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे .

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील दुष्काळी तालुक्यांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावातील शाळांमध्ये संगीत खुर्ची, सापशिडी, गोष्टी, खेळ, गाण्यांची धमाल शाळा भरली आहे. या शाळेतून विद्यार्थ्यांना जलसंधारण आणि पाणी बचतीचे महत्त्व सांगून त्यांचे मनसंधारणाचे काम सुरू आहे.

राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी २०१६ पासून पाणी फाउंडेशनची वॉटर कप ही एक लोकचळवळ म्हणून उभी आहे. ‘माथा ते पायथा’ या नियमास धरून लोकसहभागातून पाणी फाउंडेशन गावागावापर्यंत पोहोचले आहे. या चळवळीमधून अनेक गावे पाणीदार झाली. यावर्षी पाणी फाउंडेशनचे चौथे पर्व आहे. या चळवळीत लहान मुलांचा सहभाग वाढविण्यासाठी निसर्गाची धमाल शाळा, चला पर्यावरणाच्या या पुस्तकात डोकावून पाहू आशा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

पानी फाउंडेशनतर्फे निसर्गाची धमाल शाळा या पायलट प्रोजेक्टमध्ये नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे . यामध्ये १४ शाळांची निवड करण्यात आली. इयत्ता सातवी , आठवी ते नववीमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, पाणी बचत वृक्षसंवर्धन याचे प्रशिक्षण दिले जात आहे . विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व सांगून आजोबांच्या काळात ओढ्यात पाणी होते. सध्या काळात बाटलीमध्ये पाणी दिसायला लागले असून पुढल्या काळात कॅप्सूलमध्ये पाणी दिसेल, हे पाण्याचे वास्तव मांडले जाते.

ही परिस्थिती ओढवू नये म्हणून तुम्हाला हातात टिकाव, फावडे घेऊन श्रमदानाच्या चळवळीतून आपलं गाव पाणीदार करावं लागेल, असे आवाहन केले जाते. आदर्श गावचे पाणलोट उपचार असणारे मॉडेल बनवण्यास शिकवले जाते. विद्यार्थीही आवडीने अशा प्रकारे स्वत: मॉडेल तयार करतात. या निसर्ग धमाल शाळेतील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम पाणी फाउंडेशन चे सामाजिक प्रशिक्षक सरोज उपासे , पूजा वानखडे , तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे, भूषण सूर्यवंशी व पानी फाउंडेशन टीम करीत आहे

या १४ शाळांमध्ये राबविला जात आहे उपक्रम !

आर एम इंगोले हायस्कूल भारसिंगी , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय जामगाव , जनता हायस्कूल लोहारी सावंगा , श्रीराम प्राथमिक माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा खापा , एस आर के इंडो पब्लिक स्कूल जलालखेडा , नगर परिषद उच्च माध्यमिक शाळा मोवाड , नगर परिषद हायस्कूल नरखेड , नूतन शिक्षण संस्था नांदा गोमुख , नाडेकर हायस्कूल सावरगाव , एकलव्य विद्या निकेतन महाविद्यालय सावरगाव , संत भाकरे महाराज विद्यालय मेंढला , गुरुस्मृती विद्यालय भिष्णुर , थडीपवनी विद्यालय थडीपवनी .