कडेगांव येथे राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

0
1203

सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथे युवा जागृती प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी युवा नेते धनंजय देशमुख व नगरसेवक नितिन शिंदे, हणमंतराव गायकवाड, जयवंत गायकवाड, विकी निर्मळ यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी युवा जागृती प्रतिष्ठानने युवा दिनदर्शिकेचे प्रकाशनही केले.यावेळी बोलताना ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले की,भारत सरकारने १९८५ मध्ये १२ जानेवारी या दिवसाला राष्ट्रीय युवा दिन म्हणुन साजरा करायचे ठरविले आहे. स्वामी विवेकानंदांनी युवा पिढीला एक संदेश दिला की उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबु नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय गाठता येत नाही.स्वामी विवेकानंद म्हणजे अखंड हिंदुस्थानातल्या युवा पिढीसमोरच आदर्श ठेवला आहे…. यावेळी प्रदीप कोळी सर यांचेही भाषण झाले. आप्पा रास्कर,सुधाकर चव्हाण,सागर मोहीते,दशरथ चन्ने यांचेसह युवा जागृती प्रतिष्ठानचे प्रशांत ओसवाल,प्रदिप पुजारी,गणेश देशमुखे उपस्थित होते.विक्रम शिंदे यांनी आभार मानले..