हिंदु-राष्ट्र जागृती सभा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील हिंदु संघटनांचा एकत्रित येऊन कार्य करण्याचा निर्धार

0
660
Google search engine
Google search engine

अमरावती  –

 

अमरावती शहरातील संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदानावर २७ जानेवारी यादिवशी सायंकाळी ५.३० वाजता हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु-राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा केवळ हिंदु जनजागृती समितीची नसून प्रत्येक हिंदुंचे कर्तव्य असल्यामुळे जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांना सभेच्या आयोजनात सहभागी करून घेता यावे याकरिता आज १३ जानेवारीला सकाळी ११ वाजता श्री. दिलीपबाबू गणोरकर मठामध्ये आयोजन बैठकीचे आयोजन केले होते. या आयोजन बैठकीमध्ये होर्डिंग, प्रसिद्धी, सोशल मिडिया, मंदिरात प्रसार, पोस्टर, पत्रक, उद्घोषणा या विविध माध्यमांतुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याचे नियोजन झाले आणि सहभागी हिंदुत्वादी संघटनांनी एकत्र येऊन त्यासाठी कार्य करण्याचा निश्चय यावेळी केला. हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वय श्री. नीलेश टवलारे यांनी बैठकीचे स्वरूप उपस्थितांना सांगितले.

 

 

 

 

            या बैठकीला जिल्ह्यातील प्रतिष्ठीत व्यवसायिक आणि हिंदुत्ववादी श्री. चंद्रशेखर जाजोदिया, नगरसेवक श्री. चंदुभाऊ बोंबरे, श्री. प्रणित सोनी, श्रीराम सेनेचे विदर्भ अध्यक्ष प्रमेन्द्र शर्मा, विदर्भ उपाध्यक्ष श्री. अनिल शुक्ला, विदर्भ सचिव श्री. विरेंद्र उपाध्याय, जिल्हाध्यक्ष श्री. राजेश दुबे, जिल्हा सचिव श्री. नंदकिशोर दुबे, महानगर संयोजक श्री. पवन श्रीवास, महानगर सहसंयोजक श्री. विजय दुबे, गणोरकर मठाचे संयोजक श्री. जुगल ओझा, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्य श्री. मुकुल कापसे, श्री. हर्षल जोंधळे, ओजस्विनी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कु. मृणाली पाटील, श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दिक्षीत, श्री. महेश लढके, श्री. दिपक येलगलवार, धर्मप्रेमी श्री. तुषार वानखडे, ओम शांती परिवाराचे ब्रह्मकुमार राजेश भाई, डॉ. सोनवने इत्यादींसह ३२ हिंदुत्ववादी सहभागी होते.