आरोपींच्या दोन दुचाकी जप्त अनिस मो. उर्फ टिंग्या हत्या प्रकरण

165
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
       जुन्या आपसी वादातुन शुक्रवारी झालेल्या शहरातील हत्या प्रकरणातील आरोपींकडून पोलीसांनी दोन दुचाकी जप्त केल्या आहे.
        मृतक अनिस मोहम्मद उर्फ टिंग्या नूर मोहम्मद (२९) हा शुक्रवारी कोर्टात साक्ष असल्यामुळे तो चांदूर रेल्वे शहरात आला होता. सायंकाळपर्यंत कोर्टाचे सर्व काम अटोपल्यानंतर मृतक व ६ आरोपी जेवनाकरीता चमकुरा ढाबा येथे गेले असता जेवण झाल्यानंतर ढाब्यावरून बाहेर येताच जुन्या आपसी वादावरून आरोपींनी अनिस मोहम्मद उर्फ टिंग्या याच्यावर चायना चाकुने तब्बल ४६ घाव करून हत्या केली. या प्रकरणात पोलीसांनी आरोपी नईम खान रहेमान खान (३०) रा. राजीव गांधी नगर, सतिश अनंत कावरे (३३) रा. डांगरीपुरा, राहुल मधूकर सहारे (२८) रा. अंजनसिंगी, चेतन बाबाराव चित्रीव (१९) रा. जुना उमरसरा यवतमाळ ह.मु. मेहरबाबा नगर, शेख जाकीर उर्फ गोलु वल्द शेख नासीर (२९) रा. डांगरीपुरा व राहुल बच्चनलाल कनासीया (२०) रा. महादेवघाट, चांदूर रेल्वे या ६ ही आरोपींना अटक केली. अटक आरोपींविरूध्द कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी आरोपींनी लपवुन ठेवुन पळ काढला होता. त्यामुळे या दोन्ही दुचाकींचा शोध पोलीसांनी लावला असुन त्या जप्त केल्या आहे. अटक आरोपींना १५ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुणावण्यात आली आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।