राष्ट्रीय समाज पक्षाचा विदर्भ कार्यकर्ता मेळावा नागपूर येथे मोठया थाटात संपन्न – उद्घाटक म्हणून श्री महादेव जानकर यांची उपस्थिती

173

नागपूर :- राष्ट्रीय समाज पक्षाचा विदर्भ कार्यकर्ता मेळावा नागपूर येथे नुकताच मोठया थाटात संपन्न झाला  – सादर मेळाव्याला उद्घाटक म्हणून श्री महादेव जानकर यांची उपस्थिती  लाभली. या कार्यक्रमाला संपूर्ण  विदर्भातील जवळ जवळ ५ हजार ते १० हजार कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यकर्ता मेळावा मध्ये शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन त्याना गौरविण्यात आले व  ५०० ते ६०० गरजू लोकांना ब्लँकेट वाटप सुद्धा करण्यात आले

 

या मेळाव्याला भाजपा नेते आमदार श्री नरेंद्र पवार,  जिल्हा महामत्री श्री  राजुभाऊ पातकर, रासप युवक आघडी अध्यक्ष श्री राजे भाऊ फड,  मुख्य महासचिव रासप श्री बाळासाहेब दौडतले व सर्वच नेते दिग्गज मंडळी यांची ही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.  प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी  प्रा.सौ. माधुरी ताई पालीवाल व युवक प्रदेश उपाध्यक्ष श्री स्वरणिम दिक्षित यांनी या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केले होते पुढे सुद्धा यापेक्षाही मोठ्या महामेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असे त्यांनी सांगितले

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।