*पिक कर्जासाठी कानडीच्या शेतकर्‍यांवर उपोषणाची वेळ

0
933

*पिक कर्जासाठी कानडीच्या शेतकर्‍यांवर उपोषणाची वेळ.*

प्रतिनिधी (नितीन ढाकणे, दिपक गित्ते) :
मौजे कानडी ता परळी येथील शेतकऱ्यांनी पिक कर्जाची मागणी केली आसतानाही पीक कर्ज मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य किसान सभा च्या नेतृत्वाखाली कानडी ता परळी येथील शेतकरी उप विभागीय कार्यालय परळी येथे सोमवार पासून अमरण उपोषणाला बसले आहेत.
सिरसाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक या शाखेने मॅनेजर श्री राडकर साहेब यांना दि. 20/8/2018
रोजी 53 शेतकरी भेटले परंतु त्यांनी पीक कर्जाचे कागदपत्र घेण्यास टाळा टाळ करण्यात आली म्हणून दि.26/9/2018 रोजी सहाय्यक निबांधक साहेब परळी यांच्याकडे 26 शेतकऱ्यांनी कर्जाचे सर्व कागदपत्र दाखल केली व सहायक निबाधक दि.28/9/2018 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक मॅनेजर साहेब मौजे सिरसाळा यांना फाईलसह पत्र दिले परंतु त्यांनी पिक कर्ज वाटप केले नाही, त्यामुळे कानडी येथील दि.24/10/2018 रोजी 53 शेतकरी गुरा ढोरांसह बँकेसमोर आंदोलनास बसलो. त्या वेळेस प्रती हेक्टरी 60,000/- रुपय कर्ज देण्यात येईल असे लेखी दिले आहे. शेतकर्‍यांना खाजगी कॉम्पुटर वरून कर्जाच्या फाईल तयार करून घेण्याचे सांगितले शेतकऱ्यांनी कॉम्पुटर खर्च व बॉण्डसाठी 500 रुपये दिले परंतु आतापर्यंत शेतकर्‍यांचे कर्ज प्रकरण निकाली काढण्यात आले नाही हे प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात याव आशा मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.