संत जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न

137
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
श्री संताजी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम शनिवारी स्थानिक मंगलमुर्ती नगर येथील हनुमान मंदिरात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण हांडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जनता दलाचे जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे, न.प. उपाध्यक्ष देवानंद खुणे, नगरसेविका कल्पना लांजेवार, कैलास गिरोळकर, अलकाताई ढोले आदींची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषणातुन लक्ष्मण हांडे यांनी समाज जागृती झाली पाहिजे, समाजाने एकत्र येऊन संघटन मजबूत करावे असे आवाहन केले. यावेळी ह.भ.प. राजेंद्र मस्के महाराज यांच्या किर्तानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे संचालन अशोक हांडे यांनी तर प्रास्ताविक रमेश गुल्हाने यांनी केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व तेली समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।