“ मौजे तडवळा येथे वॉटसॲप  व्दारे व पाठलाग करुन महिलेचा विनयभंग ”

375

उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 66 लोकांवर कारवाई

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 13/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 66 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 15 हजार 300 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

मौजे तडवळा येथे वॉटसॲप व्दारे व पाठलाग करुन महिलेचा विनयभंग

पोलीस स्टेशन ढोकी :- मागील दोन महिन्यापासुन दिनांक 13.01.19 पावेतो प्रवीण मारुती सावंत रा. तडवळा ता. जि. उस्मानाबाद हा पिडीत फिर्यादी महिलेस मोबाईल वॉटसॲप वरुन मनाला लज्जा वाटेल असे संदेश करुन पिडीत फिर्यादी महिलेचा पाठलाग करत होता व तु नाही बोललीस तर मी तुझे नाव घेवुन मरणार अशी धमकी देत होता दिपक दिलीप ढवळे व एक महिला दोघे रा. तडवळा हे प्रवीण मारुती सावंत यास मदत करत होते म्हणुन पिडीत फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरुन 1) प्रवीण मारुती सावंत 2) दिपक दिलीप ढवळे व एक महिला यांचे विरुध्द दिनांक 13.01.19 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे भादंविचे कलम 354(ड), 506,34. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावाहन चालकावर गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन शिराढोण :- दिनांक 13.01.19 रोजी 13.50 वा. सु. शिराढोण ते कळंब जाणारे रोडवर हिंगणवगाव येथे राजेंद्र भगवान पुरी रा. गोविंदपुर ता. कळंब जि. उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील लिलॅन्ड कंपनीचा टिप्प्र क्र एम एच 48 टी 6969 हा सार्वजनिक रोडवर धोकादायक रित्या रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभा करुन रोडने येणारे जाणारे वाहनांना अटकाव होवुन ईजा होईल अशा स्थितीत उभा केलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 13.01.19 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन लोहारा :- दिनांक 13.01.19 रोजी 16.25 वा. सु. बस स्थानक लोहाराचे गेटजवळ पाटोदा ते लोहारा रोडवर तात्याराव श्रीकांत कांबळे रा. लोहारा ता. लोहारा याने त्याचे ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एम एच 25 एम 1553 चे टपावर प्लॅस्टीक चे पाईप व गाठोडे ठेवुन प्रवास करीत असताना येणारे जाणारे लोकांचे व रिक्षातील प्रवाशांचे जिवीतास धोका होईल अशा बेताने वाहन चालवित असताना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 13.01.19 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन वाशी :- दिनांक 13.01.19 रोजी 17.00 वा. सु. शिवाजी चौक वाशी येथे शिवाजी मुरलीधर राउत रा. वाशी ता. वाशी याने त्याचे ताब्यातील वाहन महिंद्रा मिनी पिकअप क्र एम एच 25 पी 3041 हा सार्वजनिक रस्त्यात मधोमध उभा करुन रस्त्याने येणारे जाणारे इतर वाहनास, पादचाऱ्यास धोका, अडथळा होईल अशा रितीने उभा केलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 13.01.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन भुम :- दिनांक 14.01.19 रोजी 13.30 वा. चे सुमारास फ्लोरा चौक ते परंडा जाणारे रोडवर भास्कर श्रीरंग गरड रा. शिवाजी नगर भुम याने त्याचे ताब्यातील आईस्क्रीम चे चारचाकी वाहन रहदारीस अडथळा होईल अशा स्थितीत रोडवर लावुन व्यवसाय करीत असताना मिळुन आला म्हणुन त्योच विरुध्द दिनांक 1401.19 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद येथे भरधाव वेगात ट्रक चालवणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 13.01.19 रोजी 00.15 वा. सु सांजा चौक उस्मानाबाद येथे विजय विठ्ठलराव राठोड रा. औसा तांडा औसा जि. लातुर याने त्याचे ताब्यातील ट्रक क्र के ए 32 सी 3127 यामध्ये सिमेंट भरुन मलखेड राज्य कर्नाटक येथुन अंमळनेर जि. जळगाव येथे घेवुन जात असताना सदर ट्रक हा हयगईने निष्काळजीपणे रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन अतिवेगात हेलकावे देत चालवुन दुसऱ्याचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने चालवित असताना मिळुन आला म्हणुन विजय विठ्ठलराव राठोड विरुध्द दिनांक 14.01.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद येथे भादंविचे कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद येथे मोटारसायकल चालकाची पादचाऱ्यास धडक

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 12.01.19 रोजी 05.30 वा. चे सुमारास ताजमहाल टॉकीज समोरील रोउवर उस्मानाबाद येथे मोटारसायकल क्र एम एच 25 वाय 0043 चा चालक याने सुभाष रामभाऊ तेरकर रा. बॅक कॉलनी उस्मानाबाद यांना पाठीमागुन जोराची धडक दिली त्यामुळे सुभाष्‍ तेरकर यांचे कपाळावर, नाकावर जखम होवुन रक्त निघाले व उजव्या पायाचे घोटयाजवळ खरचटले आहे. म्हणुन सुभाष रामभाऊ तेरकर यांचे फिर्यादवरुन मो सा क्र एम एच 25 वाय 0043 चा चालक याचे विरुध्द दिनांक 14.01.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद येथे भादंविचे कलम 279,337 सह मोवाकाचे कलम 134 (अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3

नळदुर्ग पोलीसांची कारवाई जनावरांची कत्तल करुन मांस व जिवंत जनावरे कब्जात बाळगणाऱ्यावर गुन्‍हा नोंद

पोलीस स्टेशन नळदुर्ग :- नळदुर्ग पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दिनांक 13.01.19 रोजी 23.25 वा. सु. कुरेशी गल्ली हसन कुरेशी यांचे घराजवळ नळदुर्ग येथे छापा टाकला असता 1) हसन बडेसाब कुरेशी 2) सिद्दीक बंदेअली कुरेशी दोन्ही रा. कुरेशी गल्ली नळदुर्ग ता. तुळजापुर 3) अबु तालेब कुरेशी 4) अबु ताहेर कुरेशी 5) एजाज हुसेन कुरेशी व इतर एक यांनी संगनमत करुन गोवंशीय प्राणी कापण्याचे उद्देशाने आपले ताब्यात गोवंशीय गावरान व जर्सी प्राणी बाळगुन तसेच जर्सी गाय व म्हैस विनापास परवाना कापलेले स्थितीत गोवंशीय मांस सह कब्जात बाळगलेले मिळुन आले सदर ठिकाणी मटण तोडण्याचे लाकुड, 4 चाकु, जिवंत व कापलेली , अर्धवट कापलेली जनावरे असा एकुण 6 लाख 47 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच पोलीसांनी छापा टाकुन जप्त केलेला मुद्देमाल वजन करुन परत येत असताना ट्रॅक्टर चालकास शिवीगाळ करुन त्यातील 260 किलो गोवंशीय मांस किं अं 36,400/- चा मुद्देमाल चार आरोपीतांनी बोलेरो महिंद्रा गाडीत घालुन चोरुन घेवुन गेले आहेत. म्हणुन पोलीस हवालदार शंकर भानुदास मोरे पोलीस स्टेशन नळदुर्ग यांचे फिर्यादवरुन 1) हसन बडेसाब कुरेशी 2) सिद्दीक बंदेअली कुरेशी 3) अबु तालेब कुरेशी 4) अबु ताहेर कुरेशी 5) एजाज हुसेन कुरेशी व इतर एक यांचे विरुध्द भादंविचे कलम 392,34 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम चे कलम 5(अ)(ब)(क),9(अ) सह महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औदयोगीक नगर अधिनियम 1965 चे कलम 26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।