उस्मानाबाद जिल्ह्यतील क्राईम बातम्या ….ता १५/१/२०१९

0
1162
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 126 लोकांवर कारवाई

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 14/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 126 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 33 हजार 100 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

मौजे खामकरवाडी येथे किरकोळ कारणावरुन महिलेस मारहान

पोलीस स्टेशन येरमाळा :- दिनांक 14.01.19 रोजी 11.00 वा सु. मौजे खामकरवाडी गावात 1) बबलु गोळे 2) नितीन गोळे 3) सचिन गोळे सर्व रा. खामकरवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद यांनी संगनमत करुन फिर्यादी महिलेस तुझे दुधाचे कशाचे पैसे असे म्हणुन शिवीगाळ करुन नितीन गोळे याने फिर्यादी महिलेच्या मनगटावर काठीने मारुन दुखापत केली म्हणुन फिर्याद महिलेच्या फिर्यादवरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 14.01.19 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे भा.दं.वि. चे कलम 324,504,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

2

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे नोंद

पोलीस स्टेशन आंबी :- दिनांक 14.01.19 रोजी 16.30 वा.सु.दांडेगाव ते नळी वडगाव रोडवर दत्ता शाहु भोगील रा.दांडेगाव ता.भुम याने त्याचे ताब्यातील कमांडर जिप क्र. एमएच 16 ई 2740 ही सार्वजनिक रस्त्यावरुन येणारे जाणारे लोकांना व वाहनांना अडथळा निर्माण होईल व एखादा अपघात होवू शकेल अशा रितीने सार्वजनिक रस्त्यावर उभा केलेला मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 14/01/2019 रोजी पोलीस स्टेशन आंबी येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन नळदुर्ग :- दिनांक 14.01.19 रोजी ईटकळ ते नळेगाव जाणारे रोडवर ईटकळ येथे अमित बाजीराव बागडे रा.ईटकळ ता.तुळजापूर याने त्याचे ताब्यातील मॅजीक वाहन क्र.एम.एच. 25 आर. 5229 ही सार्वजनिक रस्त्यावरुन येणारे जाणारे लोकांना व वाहनांना अडथळा निर्माण होईल अशा रितीने सार्वजनिक रस्त्यावर उभा केलेला मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 14/01/2019 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दिनांक 14.01.19 रोजी ईटकळ ते निलेगाव जाणारे रोडवर ईटकळ येथे सलीम चंदु पटेल रा.शहापुर ता.तुळजापूर याने त्याचे ताब्यातील ॲपे रिक्षा क्र.एम.एच. 25 एच. 8418 ही सार्वजनिक रोडवर अडथळा निर्माण होईल अशा धोकादायक स्थितीत उभा केलेला मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 14/01/2019 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन भुम:- दिनांक 14.01.19 रोजी 12.30 वा.सु. वालवड ते पाथ्रुड जाणारे रोडवर तलाठी कार्यालय वालवड येथे अल्लाउद्दीन शब्बीर तांबोळी रा.पाथ्रुड ता.भुम याने त्याचे ताब्यातील क्रुझर जिप क्र. एम.एच. 13 बी.एन. 1407 ही सार्वजनिक रस्त्यावरुन येणारे जाणारे लोकांना व वाहनांना अडथळा निर्माण होईल व एखादा अपघात होवु शकेल अशा रितीने सार्वजनिक रस्त्यावर उभा केलेली मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 14.01.2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दिनांक 14.01.2019 रोजी 13.00 वा.सु. वालवड ते गणेगाव जाणारे रोडवर आबासाहेब भारत पालके रा.वांगी बु. ता.भुम याने त्याचे ताब्यातील ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 23 एक्स 402 ही सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरित्या उभा केलेला मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 14.01.2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे वडणेर येथे कोर्टातील केस माघे घे म्हणुन मारहान

पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 14.01.19 रोजी 10.00 वा सु. रावसाहेब मोरया जाधव रा. वडणेर ता. परंडा हे त्यांचे घरासमारे असताना 1) चंद्रकांत काळु डिकुळे 2) वसंत काळु डिकुळे 3) शिवाजी काळु डिकुळे 4) हिरामन दिगंबर डिकुळे 5) निलेश वसंत डिकुळे 6) गोपीनाथ डिकुळे सर्व रा. उंडेगाव ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन रावसाहेब मोरया जाधव यांना तु कोर्टातील चालु असलेली केस का काढुन घेत नाही असे म्हणुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान करुन डोक्यात काठीने मारुन जखमी केले व रावसाहेब यांचा भाऊ संजय व आई यांना मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन सावसाहेब मोरया जाधव यांचे फिर्यादवरुन दिनांक 14.01.19 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 324,143,147,148,149, 504,506 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

3

परंडा येथे मागील भांडणाची कुरापत काढुन मारहान

पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 14.01.19 रोजी 16.30 वा सु. पोलीस स्टेशन परंडा येथे 1) रावसाहेब मोरया जाधव 2) भारत मोरया जाधव 3) संजय मोरया जाधव 4) मोरया व्यंका जाधव सर्व रा. वडनेर ता. परंडा यांनी मागील भांडणाची कुरापत काढुन अनिल उत्तम डिकुळे रा. उंडेगाव ता. परंडा यांना शिवीगाळ केली व रावसाहेब जाधव याने अनिल डिकुळे यांच्या डोक्यात दगडाने मारुन दुखापत केली म्हणुन अनिल उत्तम डिकुळे यांचे फिर्यादवरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 14.01.19 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुरुड ते पळसप जाणारे रोडवर मोटारसायकलच्या अपघातात महिलेचा मृत्यु

पोलीस स्टेशन ढोकी :- दिनांक 02.01.19 रोजी 17.00 वा. सु. भारत ज्योतीराम भोंग व त्यांची पत्नी असे मोटारसायकलवरुन जात असताना मुरुड ते पळसप जाणारे रोडवर राजेंद्र सुखदेव गायकवाड रा. उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल क्र एम एच 25 ए एम 8423 ही हयगईने व निष्काळजीपणे तसेच रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन मोटारसायकल भरधाव वेगात चालवुन म्हशीला कट मारण्याचे नादात अचानक ब्रेक मारल्याने भारत ज्यातीराम भोंग व त्यांची पत्नी सुगंधा भारत भोंग या मो सा वरुन खाली पडल्याने तीचे डोकयास गंभीर मार लागुन सुगंधा भारत भोंग यांचे मरणास कारणीभुत झाला आहे म्हणुन भारत ज्योतीराम भोंग याचे फिर्यादवरुन राजेंद्र सुखदेव गायकवाड याचे विरुध्द दिनांक 14.01.19 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे भादंविचे कलम 304(अ),279 सह मो वा का चे कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एन.एच. 52 रोडवर पारगाव शिवारात ट्रक व मोटारसायकलच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पोलीस स्टेशन वाशी :- दिनांक 14.01.2019 रोजी संध्याकाळी 16.30 वा.सुमारास एन.एच. 52 रोडवर स.द.पारगाव जवळ पारगाव शिवारात ट्रक क्र. एच.आर. 74 ए. 8106 चा चालक याने त्याचे ताब्यातील ट्रक ही भरधाव वेगाने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन निष्काळजीपणे हयगईने समोरुन येणारी होन्डा ड्रिम युगा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.ए. 1836 हिस समोरुन जोराची धडक देवून 1) वैभव मिनीनाथ भैरट रा.शेलगाव ता.वाशी 2) शिवम दादासाहेब गायकवाड रा.सरमकुंडी ता.वाशी यांना गंभीर जखमी करुन त्यांचे मरणास कारणीभुत झाला व अपघाताची खबर न देता निघुन गेला आहे. म्हणून विश्वनाथ ज्ञानोबा भैरट रा.शेलगाव ता.वाशी यांचे फिर्यादवरून ट्रक क्र. एच.आर. 74 ए. 8106 चा चालक याचे विरुध्द दिनांक 15/01/2019 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 279,337,338,304(अ) सह मोवाकाचे कलम 134(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4

मौजे कनगरा येथे शेततळयावरील ईलेक्ट्रीक पानबुडी मोटारची चोरी

पोलीस स्टेशन बेंबळी :- दिनांक 12.01.2019 रोजी 18.00 ते दिनांक 13.01.2019 रोजी 03.00 वा.चे दरम्यान मौजे कनगरा येथून गोविंद रंगराव अंधारे रा.कनगरा ता.जि.उस्मानाबाद यांचे शेत शिवार गट नं. 352 मधील गोविंद रंगराव अंधारे यांचे शेततळयावर लावलेली टेक्स्मो कंपनीची पानबुडी इलेक्ट्रीक मोटार जु.वा.किं.अं. 5000/- रु.ची मोटारीचे पाईप कट करून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे. म्हणून गोविंद रंगराव अंधारे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 15/01/2019 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.