सेदानी इंग्लिश स्कूल मध्ये माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

0
766
Google search engine
Google search engine

अकोट/प्रतिनिधी

स्थानिक लेट दिवाली बेन इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन दिनांक 12 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळा अध्यक्ष स्मिता सेदानी, प्रिन्सिपल विजय भागवतकर, माध्य. मुख्याध्यापक प्रशांत मंगळे प्राथ. मुख्याध्यापिका स्नेहल अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर अनुश्री रेलकर ,चंचल पितांबरवाले किशोरे रेखाते नितीन भास्कर संतोष विणके हे मान्यवर अतिथी म्हणुन लाभले होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.तसेच यावेळी मॉ जिजाऊंच्या व स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमांना हारापर्ण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले तसेच युवा दिन निमित्य युवा शिक्षकांना सन्मानित करण्यातआले. कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी हे स्वामी विवेकानंद व जिजाऊंच्या आकर्षक वेशभूषा साकारुन मंचावर उपस्थित होते.या सर्व विद्यार्थ्यांचे स्कूलच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला

तर शर्वरी सावरकर आदित्य गडम, गौरी पिंपळे ,श्रावणी माकोडे,आर्यन नांदुरकर,जान्हवी सोरते,पियुश बहादुरे,हर्षल पुरी,ईशिका अंबळकार,इंद्रायणी हेंड या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे व शिक्षकांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माया कोरडे यांनी केले तर आभार किशोर रेखाते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.