श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथील यात्रेस भक्तीभावात सुरवात

0
1254
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके

श्री संत गजानन महाराज मुळ चरण पादुकांच्या दर्शनाने श्री भक्तांमध्ये प्रसिद्धीस पावलेल्या पादुका संस्थान मुंडगावच्या यात्रेस भक्तीभावात कालपासुन सुरवात झाली आहे.
यात्रा महोत्सवात १४ जानेवारी २०१९ सोमवार ला तिर्थ स्थापना करण्यात आली.तर यात्रे निमित्य भागवतकथा सप्ताहामध्ये साध्वी अयोध्या दीदी (आळंदी ) यांचे मधुर वाणीतुन श्रीमद भागवत कथा पार पडते आहे.

कथा
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे श्रींचा मुर्ति अभिषेक, काकडा आरती सकाळी ११ वा नैवेद्य आरती११ ते दुपारी १ वा. महाप्रसाद दुपारी १. ३० मी ह. भ. प. साध्वी अयोध्या दीदी (आळंदी ) यांचे मधुर वाणीतुन श्रीमद्भागवत कथा वाचन तर संध्याकाळी हरिपाठ व आरती रात्री महाप्रसाद वितरण
तसेच रात्री ८. ३० ते १० सातही दिवस नामवंत किर्तनकारांचे किर्तनाचा लाभ श्रींच्या भक्तांनकरीता असणार आहे.यात्रा महोत्सवात
दी २१ जानेवारी २०१९ सोमवार ला यात्रा, दहीहांडी सकाळी ९ ते ११ वा ह. भ. प श्री गजानन महाराज हिरुळकर (जैनपुर ) यांचे काल्याचे कीर्तन पार पडणार आहे.

काल्याचे किर्तन दहींहंडी गोपालकाल्यानंतर सकाळी ११ ते ६ वा पर्यंत भव्य महाप्रसाद वितरण होणार आहे.तसेच दु.१२ ते ५ वा पर्यंत श्रींची भजन दिंडि पताकासह भव्य मिरवनुक पार पडणार.संध्या ५.३० वा. दहीहांडी सोहळा
संध्या.६ वा भजनी दिंडि, विनेकरी टाळकरी यांचा सन्मान दि. २२ जानेवारी सकाळी प्रक्षाळ पूजा असे आठवडाभर विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.मुंडगावातील श्री गजानन महाराजांचा उपस्थितीत श्री झामसिंग राजपूत यांच्या वाडयात सुरुवात झालेल्या यात्रेत सहभागी होवुन श्रींचा मुळ चरण पादुकां, विश्रांतिचा पलंग, रथ, धूनीचे दर्शन घ्यावे.असे आवाहन श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव ता. अकोट जि. अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे