विदर्भ ब्रेकिंग :- धक्कादायक…… ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार – २६ वर्षीय आरोपी अटकेत 

0
2657
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
सगळीकडे सतत बलात्कार, अतिप्रसंगाच्या घटना थांबायचे नाव घेत नसुन दररोज घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच चांदूर रेल्वे तालुक्यात सुध्दा चक्क ४ वर्षीय चिमुकलीवर २६ वर्षीय युवकाने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान आमला (विश्वेश्वर) येथे घडली.

चांदूर रेल्वेवरून १० कि.मी. अंतरावरील आमला (विश्वेश्वर) येथील राजकाम करणारा आरोपी निलेश मनोहर खांडखुरे (२६) याने गावातीलच ४ वर्षीय चिमुकलीला मंगळवारी ९.३० वाजता आपल्या घरी बोलाविले. आरोपीच्या घरी घटनेच्या वेळी कोणीच नसल्याचे समजते. यानंतर आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. कुऱ्हा पोलीसांनी दुपारी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला. चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (आय) (जे) आयपीसी २, ४, ८, १२ पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कुऱ्हा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वैश्य मॅडम करीत आहे.