अकोट शहर पोलीसांच्या डीबी पथकाने दिले 12 गोवंशाना जीवनदान

0
663
Google search engine
Google search engine

आकोट/ता.प्रतीनीधी

मकर संक्रांतीला गौपुजन करण्याची प्रथा असतांना संक्रांतीच्या पूर्वसंध्येला 12 गोवंशीय जनावरांना जिवनदान देत कत्तलीपासुन वाचवत शहर पोलीसांनी जिवनदान दिले.याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सुत्रा नुसार दि. १४ जाने. रोजी रात्री डीबी पथक प्रमुख सपोनि ज्ञानोबा फड यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून अतिशय गोपनीयता ठेऊन पोलीसांनी बर्डे प्लॉट ,अकबरी प्लॉट चे सीमेवरील खुल्या मैदानात रात्रीच्या वेळी छापा मारला. यावेळी पोलीसांना गोवंशीय जातीचे १२ बैल किंमत १,३६,००० सुती दोराने एकमेकांना बांधलेले मिळून आले. पोलीसांनी बैला बाबत चौकशी केली असता कोणीही मालकी हक्क सांगण्याबाबत समोर आले नाही. त्यामुळं १२ जनावरे हे कत्तली करिता आणली असल्याची पोलीसांना खात्री झाल्याने ते जप्त करून पोलीस स्टेशन अकोट शहर येथे आणण्यात आले.याप्रकरणी पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ५(अ)(ब),९(अ) प्राणी सरंक्षण अधिनियम १९९५ प्रमाणे गुन्हा नोंद केला. तसेच त्या १२ जनावरांना गोरक्षण संस्था अकोट येथे दाखल केले .
सदरची कार्यवाही SDPO सुनिल सोनवणे , ठाणेदार संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानोबा फड, PSI महेंद्र गवई , Asi रणजित खेळकर, Hc संजय घायल, नापोका राकेश राठी,गोपाल अघडते,सुलतान पठाण, विजय सोळंके यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.