चांदुर बाजार आयटीआय कॉलेज मध्ये विद्यार्थी याना विधुत सुरक्षा बाबत चर्चा आणि परिसंवाद विधुत निरीक्षण विभाग, ऊर्जा आणि कामगार विभाग आणि महावितरण च्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रम

0
884

चांदुर बाजार आयटीआय कॉलेज मध्ये विद्यार्थी याना विधुत सुरक्षा बाबत चर्चा आणि परिसंवाद
विधुत निरीक्षण विभाग, ऊर्जा आणि कामगार विभाग आणि महावितरण च्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रम

चांदुर बाजार:-

आज आपल्या जीवनात अन्न, वस्त्र, निवारा,या मूलभूत गरजा असल्या तरी त्याच बरोबर विजेला सुद्धा अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपण विजेचा वापर योग्य पद्धतीने करणे आणि करायला सांगणे हे महत्वाचे ठरते असे वक्तव्य अमरावती येथील विधुत निरीक्षक शिंगणे आणि चांदुर बाजार येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विधुत सुरक्षा हप्ता आयोजित कार्यक्रम वेळी म्हटले.यावेळी संस्थेमधील शिक्षक, विद्यार्थी, चांदुर बाजार उपविभागीय कार्यकाल मध्ये कार्यरत सर्व अभियंता, आणि कर्मचारी उपस्थित होते.

ज्या गोष्टी आपल्याला सहजासहजी उपलब्ध होते आपल्याला त्याची जाणीव नसते.मात्र आज झपाट्याने विकास होत आहे.त्याचप्रमाणे विजेचा वापर सुद्धा अधिक जास्त प्रमाणात होते आहे.मात्र या सर्व धावपळीच्या युगात विजेच्या वापर हा योग्य पद्धतीने आवश्यक आहे.ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.त्याच प्रमाणे आपल्या तक्रार चे निराकरण करण्यासाठी मोठ्या शहरात ग्राहक तक्रार केंद्र या ठिकाणी जाऊन आपली तक्रार नोंदवली पाहिजे.अशी माहिती चांदुर बाजार येथील उपकार्यकरी अभियंता सुधीर वानखडे विद्यार्थी याना दिली.

11 जानेवारी ते 17 जानेवारी या वेळी विधुत सुरक्षा हप्ता चे आयोजन करण्यात येते.यावेळी विजेच्या सुरक्षा, आणि वापराबाबत माहिती दिली गेली. तसेच आपण सर्वांनी वीज वापराबाबत काळजीपूर्वक राहणे गरजेचे आहे.यावेळी विधुत निरीक्षक कार्यलाय मधील रोहिणी साबळे यांनी विद्यार्थी तसेच मान्यवर याना विद्युत सुरक्षा बाबत शपथ घेतली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य झगेकर, प्रमुख पाहुणे शिंगणे, सह विधुत निरीक्षक नितीन मेश्राम,उपकार्यकरी अभियंता चांदुर बाजार सुधीर वानखडे,गौरखेडे आयटीआय शिक्षक, अमरावती जिल्हा प्रेस प्रतिनिधी बादल डकरे,ग्रामीण 2 चे सहायक अभियंता अमित गायकी,अभियंता सुबोध सांबरे,शशिकांत राऊत , अभियंता काळे,मीसुरकर,गेडाम,पापडकर हे उपस्थित होते.कार्यक्रम चे सूत्रसंचालन नितीन मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन सहायक अभियंता काळे यांनी केले.