युवा संघर्ष समितीचे आत्मदाह आंदोलन २१ रोजी- आंदोलक “करो या मरो” च्या भूमिकेवर ठाम

0
1181
Google search engine
Google search engine

मागण्या मान्य न झाल्यास परिस्थिती चिंगळण्याची शक्यता

चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने २०१३ साली प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले होते परंतु पाच वर्षे लोटूनही बांधकामाचा पाया सुद्धा खोदण्यात आलेला नसल्याने व स्मशान भूमीला प्रेत घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रेता सोबत घेऊन जाणार्याच्याही जीवाला धोका निर्माण होत असल्याने व स्मशान भूमीत प्रेत जाळण्या करिता जागा नसल्याने तेथील सौंदयीकरण करण्याकरीता व घाटलाडकी ते मोर्शी रोडवरील चारगड नदी पात्रा वरील पूलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांना व प्रवाशांना रस्त्याने ये जा बंद करावे लागते पुलाची उंची वाढून बांधकाम करण्या करीता युवा संघर्ष समिती व गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या वेळकाढू कारभारा विरोधात आत्मदाह आंदोलनाचा इशारा ४ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला दिला आहे अद्याप पर्यंत प्रशासना कडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे युवा संघर्ष समिती चे म्हणणे आहे.