श्री शिवाजी महाविद्यालय मध्ये अनोखे मतदान

0
866
Google search engine
Google search engine

अकोला:- अकोल्याच्या शहरी पक्षी साठी होणार मतदान पाच उमेदवार पक्षी निवडणुकीच्या रिंगणात

बातमी येत आहे अकोला येथून आतापर्यंत आपण निवडणुकीच्या बातम्या बघितलेले आहेत त्या बातम्यांमध्ये आपण नेहमी बघतो की निवडणूक आली म्हणजे कार्यकर्ते आणि नेते मंडळींची धुमाकूळ सुरू होते परंतु ही एक वेगळीच निवडणुक पहायला मिळते ती सुद्धा पक्ष्यांची निवडणूक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निवडणुकीची प्रक्रिया काय असते या बद्दल संपूर्ण माहिती जाणकारी असावी या उद्देशातून निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा जो अधिकार आहे तो महाविद्यालयीन व शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आहे.

ही पक्ष्यांची निवडणूक आहे या निवडणुकी मध्ये पक्षाला मतदान करायचा आहे अर्थातच अकोला शहराचा पक्षी कोण, कोणता पक्षी हा शहरातला एक नंबर चा मानकरी ठरतो हे जाण्याकरता ही निवडणूक ठेवलेली आहे.
पहिल्यांदाच शहरात पक्ष्यांची
निवडणूक होत असून, त्यासाठी
रिंगणात उमेदवार म्हणून पाच प्रजातींचे
पक्षी राहणार आहेत. निवडणुकीसाठी
पक्षीमित्रांच्या एकमताने राखी धनेश,
सुभग, काळा शराटी, गायबगळा व हुप्पू
किंव्हा हुदहुद या पाच पक्ष्यांना उमेदवारी
देण्यात आली आहे.
प्रचाराच्या माध्यमातून विद्यार्थी
मतदारांना समाजवून सांगितल्यानंतर
त्यांना मतदानासाठी आवाहन करण्यात
येत आहे. हे सर्व मतदान वी वी पॅड द्वारे होणार आहे भविष्यामध्ये जे भावी मतदार विद्यार्थी निवडणुकीला आपले मतदान करतील त्यांना ही प्रक्रिया समजेल की आपण ज्या व्यक्तीला मतदान केले त्याच व्यक्तीला ते मतदान जात आहे की नाही
१५ ते २३ जानेवारी या कालावधीत शहरातील सर्वच शाळांमध्ये प्रचारा सोबतच निवडणूक प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे. तर निकाल २५ जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिनी होणार आहे.