श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात “इंडस्ट्री-इंस्टिट्युट-मिट” चे आयोजन

0
575
Google search engine
Google search engine

शेगांव:- श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक १९ आणि २० जानेवारी २०१९ ला “इंडस्ट्री-इंस्टिट्युट-मिट” चे आयोजन नवीन सभागृहात केले आहे. देशभरातून शंभर च्या आसपास उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले नामवंत व्यक्ती यात सहभागी होणार आहेत. यामध्ये अनेक नामवंत कंपन्यांचे संस्थापक, प्रेसिडेंट, सी.ई.ओ., एच. आर. यांचा समावेश आहे. दोन दिवस विचारांची आदान-प्रदान सुरु राहील.

सहभागी व्यक्ती विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मान्यवर मंडळी आपली मते मांडणार आहेत. उद्योग जगतात होत असलेले बदल आणि त्यासाठी आवश्यक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवता येईल जेणेकरून त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील यावर उहापोह होणार आहे. महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी महाविद्यालयातर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी अश्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या दरम्यान महाविद्यालय आणि उद्योग जगताशी सामंजस्य करार होणार आहेत. महाविद्यालया तर्फे तयारी पूर्ण झाली असून इंडस्ट्री-इंस्टिट्युट-मिट मध्ये सहभागी मान्यवरांनासाठी निवास, भोजन आणि ट्रान्सपोर्ट ची व्यवस्था करण्यात आली आहे.