स्व मोहनराव तोटे स्मृती लिंबूवर्गीय फळ पुरस्कार, 2018 व 2019 संयुक्तपणे जाहीर आज जागतिक संत्रा महोत्सवात केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग , राज्यपाल विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते होणार पुरस्काराचे वितरण .

0
990
Google search engine
Google search engine

स्व मोहनराव तोटे स्मृती लिंबूवर्गीय फळ पुरस्कार, 2018 व 2019 संयुक्तपणे जाहीर

आज जागतिक संत्रा महोत्सवात केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग , राज्यपाल विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते होणार पुरस्काराचे वितरण .

सन 2018 सालचा उद्योजक प्रवर्ग पुरस्कार श्री सोनू खान, एम के एस फ्रुट कं. वरुड, जि अमरावती, तर सन 2019 सालचा श्री निलेश सुरेशराव रोडे, मोर्शी ,जि अमरावती या उद्यमशील तरुण शेतकरी तथा उद्योजक याना जाहीर करण्यात आला आहे.

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

भारतीय संत्रा उत्पादन महासंघ, या राष्ट्रिय लिंबूवर्गीय फळ उत्पादन संघातर्फे दरवर्षी दिल्या जाणारे प्रतिष्ठेचे फळ उत्पादक, संशोधक, उद्योजक पुरस्कार “जागतिक संत्रा महोत्सव,2019” च्या पूर्वसंध्येला भारतीय संत्रा उत्पादक संघाचे संशोधन समितीचे अध्यक्ष तथा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष, मा डॉ शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी भारतीय संत्रा उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष कृषी भूषण, कृषक शिरोमणी स्व मोहनराव तोटे स्मृती लिंबूवर्गीय फळ पुरस्कार घोषित केले.

संत्रा उत्पादन, संशोधन, विक्री व्यवस्थापन या तीन स्वतंत्र प्रवर्गात हे पुरस्कार उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना प्रदान केले जातात. यापूर्वी संत्रा उत्पादन क्षेत्रामध्ये श्रीयुत मनोज जानरावजी जवंजाळ, काटोल, श्री बालविंदारसिंग रंधावा, पंजाब याना प्रदान करण्यात आला आहे.
संशोधन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवर शास्त्रज्ञ प्रवर्गात संत्रा या विषयाला आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातलेले, अमूल्य योगदान देऊन संत्रा उत्पादनामध्ये क्रांती घडवून आणण्यात मैलाचा दगड ज्यांचे संशोधन ठरले असे स्व डॉ एस.ए.एम.एच. नकवी यांना सन 2015 साली मरणोत्तर, तर श्रीयुत डॉ अंबादास हुच्चे केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर येथील वरिष्ठ संशोधक याना सन 2016 सालचा व डॉ डी. एम.पंचभैये, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याचे शास्त्रज्ञ व प्राध्यापक याना सन 2017 सालचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

विक्री व्यवस्थापन, उद्योजक याचा वाटा उत्पादक शेतकरी यांच्या अर्थकारण वाढीमध्ये अनन्यसाधारण असतो, त्यामुळेच सन 2017 साली उद्योजक प्रवर्ग पुरस्कार देण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला त्यानुसार प्रथम पुरस्कार वरुड येथील श्री ताज खान या कल्पक व धडाडीच्या व्यवसाईकला हा पुरस्कार सन 2017 साली प्रदान करण्यात आला.
सन 2018 सालचा उत्पादक प्रवर्ग पुरस्कार श्री संतोष ज्योतिप्रसाद पेठे, मोर्शी,जि. अमरावती, तर सन 2019 सालचा पुरस्कार श्री बद्रीनाथ धाकड, सेमला धाकड, मध्यप्रदेश याना जाहीर झाला आहे.
सन 2018 सालचा संशोधक प्रवर्गा पुरस्कार श्रीयुत अनुपकुमार श्रीवास्तव, वरिष्ठ संशोधक,मृद शास्त्र, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर, तर सन 2019 चा पुरस्कार श्रीयुत डॉ मिलिंद लदानिया, संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर याना जाहीर झाला आहे.

सन 2018 सालचा उद्योजक प्रवर्ग पुरस्कार श्री सोनू खान, एम के एस फ्रुट कं. वरुड, जि अमरावती, तर सन 2019 सालचा श्री निलेश सुरेशराव रोडे, मोर्शी ,जि अमरावती या उद्यमशील तरुण शेतकरी तथा उद्योजक याना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा “जागतिक संत्रा महोत्सवाच्या ” समारोपीय समारंभात केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग, तथा महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते होणार आहे.