गृहराज्यमंत्री ना.डॉ रणजीत पाटील यांचा वाढदिवस आकोटात विविध उपक्रमांनी साजरा

0
1330

रक्तदान शिबीर,वृक्षारोपन,क्रीडा स्पर्धांसह विविध कार्यक्रम

आकोट/ता.प्रतीनीधी

भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार नेते तथा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.डॉ. रणजीत पाटील यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी अकोट च्या वतीने रक्तदान शिबीर,वृक्षारोपन,क्रीडा स्पर्धांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसा निमित्य सकाळी 11 वाजता डॉ,लोखंडे हॉस्पिटल येथे मा. एड. बाळासाहेब आसरकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 25 रक्तदात्यांनी रक्तदान केलेया कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.लांडे भाजपाचे अकोट शहर माजी अध्यक्ष योगेश नाठे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. गजानन महाले बेलुरा ग्रामपंचायत सरपंच राम मंगळे नंदू लोखंडे मयूर आसरकर राजासाहेब शेळके गजानन खंडेराय सुनील बदरखे मनोज चंदन मंगेश पटके सागर बोरोडे विलास बोडखे, मयुर नाठे ,रमेश हेंद अक्षय ताडे, गणेश नाठे पंकज श्रीवास्तव प्रल्हाद कायवाटे, मिलिंद चिखले देवेंद्र टीगने राहुल येऊल प्रतीक हेंड अनिकेत कुलट मंगेश अकोटकर शेख जमाल जाकिर शाह किस्मत खा राहुल वाकोडे आनंद खडसान प्रशांत बेराड गजानन,आकोटकर ऋषिकेश पाटील प्रकाश दाभाडे ऋषिकेश बेराड वसंत नेमाड़े उमेश हरसुलकर शेख सलीम शेख अलीम इत्यादींच्या उपस्थितीत अकोट येथील सुप्रसिद्ध डॉक्टर लोखंडे हॉस्पिटल यांच्या हॉस्पिटलमध्ये हे रक्तदान शिबिर पार पडले.तसेच उमरा येथे सेवानिवृत्त अधिकारी अरुण इंगळे यांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडले डॉक्टर अरविंद लांडे योगेश नाठे राजू मावलकर बेलुरा चे सरपंच राम पाटील मंगळे इत्यादींची उपस्थिती होती यानंतर बेलुरा येथे क्रिकेटचे सामन्याचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच राम मंगळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी भाजपाचे डॉ. अरविंद लांडे व मा.शहर अध्यक्ष योगेश नाठे गावकरी उपस्थितीमध्ये करण्यात आले अकोट तालुक्यात व शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर रणजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.