पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी जिल्हाप्रमुख खांडेंना दिल्या शुभेच्छा 

0
665
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

 बीड :शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना वार्षिक पक्षकार्याचा अहवाल जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मातोश्री येथे भेट घेत दिला. यावेळी या अहवाल पाहत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी पुढील पक्षकार्यासाठी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षसंघटनवाढ व विस्तार जोमाने करा असे सांगत दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याचा आदेशदेखील यावेळी जिल्हाभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला आहे. 

  मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची भेट घेत जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पक्षकार्याचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी हा अहवाल पाहत वार्षिक कार्याचे अवलोकन केले. यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुख खांडेंसह सर्व शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतीनिधी व शिवसैनिकांना आगामी काळात निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षकार्य वेगात वाढवायचा आदेश दिला. पक्षसंघटनवाढ व विस्तार जोमाने करा असे आदेशित करत असतानाच त्यांनी या भेटीदरम्यान बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडलेला असून येथील शेतकऱ्यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लागेल ती मदत करावी असेही सांगितले आहे. शिवसेनेला भीषण दुष्काळाची जाण असून शिवसेना पावलोपावली शेतकऱ्यांसोबत आहे हे सिद्ध करून दाखवा असे यावेळी त्यांनी सांगितले आहे. या पक्षप्रमुखांच्या भेटीदरम्यान जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंसह उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांची उपस्थिती होती