उमरगा येथे स्विट मार्ट मध्ये काम करण्याच्या कारणावरुन खुन

0
948
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 84 लोकांवर कारवाई

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 19/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 84 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 16 हजार 800 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई

पोलीस स्टेशन भुम :- दिनांक 19.01.19 रोजी पाथ्रुड बस स्टॅड येथे सुधीर भानुदास वारे रा. पाथ्रुड याने त्याचे ताब्यातील क्रुझर जीप क्र एम एच 25 आर 2548 ही येणारे जाणारे लोकांना अडथळा निर्माण होवुन त्यांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने उभा केलेली मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन वाशी :- दिनांक 19.01.19 रोजी शिवाजी नगर ते कॉलेज रोडवर वाशी येथे रामदास शामराव वरकड रा. शेंडी ता. वाशी याने त्याचे ताब्यातील रिक्षा क्र एम एच 23 – 4033 हा सार्वजनिक रस्त्यावर मधोमध उभा करुन येणारे जाणारे इतर वाहनास व लोकास धोका निर्माण होईल अशा रितीने उभा केलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बेंबळी येथे भरधाव वेगात व हयगईने वाहन चालविणाऱ्यावर गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन बेंबळी :- दिनांक 19.01.19 रोजी 17.15 वा. सु. सरस्वती हायस्कुल समोर बेंबळी येथे महादेव फुलचंद लोमटे रा. महाळंगी ह. मु. दार फळ ता. जि. उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील टेम्पो क्र एम एच 45 टी 5111 हा रस्त्याचे परिस्थितीचे भान न ठेवत भरधाव वेगात व हयगईने मानवी जिवीतास धोका होईल अशा रितीने चालवित असताना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे भादंविचे कलम 279 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

3

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 20.01.19 रोजी 02.20 वा.सु. सांजा चौक उस्मानाबाद येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 रोडवर हन्नुशहा शब्बीरशहा रा.चन्नवीरनगर, फिल्टरबेड रोड गुलबर्गा ता.जि.गुलबर्गा (कर्नाटक) याने त्याचे ताब्यातील ट्रक क्र. सी.जी 04 जे डी. 3834 यामध्ये गुलबर्गा येथुन भंगार भरुन ते जालना येथे घेवून जात असताना सदर ट्रक ही हयगईने व निष्काळजीपणे रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन अती वेगाने चालवून दुसऱ्याचे जीवीतास धोका निर्माण होईल व अपघातास कारणीभुत ठरेल अशा रितीने चालवित असताना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 20.01.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 279 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मौजे आंदोरी येथे किरकोळ कारणावरुन जिवे मारण्याचा प्रयत्न

पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 05.01.19 रोजी 12.00 ते 12.30 वा. सु. महादेव रामलिंग बारस्कर रा. आंदोरी ता. परंडा जि. उस्मानाबाद हे व साक्षीदार असे त्यांचे घरासमोर थांबले असता 1) गणेश वैजीनाथ बारस्कर 2) विनोद वैजीनाथ बारस्कर 3) वैजीनाथ दादाराव बारस्कर सर्व रा. आंदोरी ता. परंडा हे हातात काठी व तलवार घेवुन जिवे मारण्याचे उद्देशाने शिव्या देत आले होते त्यावेळी महादेव रामलिंग बारस्कर यांनी विनाकारण शिव्या का देता असे विचारले असता विनोद बारस्कर व वैजीनाथ बारस्कर यांनी काठीने मारहान केली गणेश बारस्कर याने तलवारीने हल्ला केला त्यावेळी साक्षीदार यांनी गणेश बारस्कर यास ढकलुन दिल्याने तलवार लागली नाही वरील आरोपीतांनी जोरजोरात तु फार माजला आहेस आमचा ऊस आडवतोस काय असे म्हणुन मारुन टाकु अशी धमकी दिली म्हणुन मा. न्यायालयाच्या आदेशाने महादेव रामलिंग बारस्कर यांचे फिर्यादवरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 307,324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा येथे स्विट मार्ट मध्ये काम करण्याच्या कारणावरुन खुन

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 10.01.19 रोजी 16.00 वा. सु. एस.टी स्डॅन्ड उमरगा समोर रोडचे बाजुस उमरगा येथे राजाराम खिमाराम मिना रा. मु. पो. देवान ता. रोहीट जि. पाली (राजस्थान) त्याचा भाऊ कालीयाराम खिमाराम मिना (मयत), व मुकेश कुय्याराम भिल रा. आलावा ता. आहोर जि. जालोर (राजस्थान) यांचे मध्ये स्विट मार्ट मध्ये काम करण्याच्या कारणावरुन मुकेश कुय्याराम भिल याने कालीयाराम खिमाराम मिना यास शिवी देवुन धारधार चाकुने पोटाला, उजव्या हाताला जबर मारहान करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी स्विट मार्ट चे मालक छगनलाल परामार यांनी कालीयाराम खिमाराम मिना (मयत), यास श्री सेवा हॉस्पीटल उमरगा येथे उपचार घेवुन पुढे 15.01.19 रोजी 15.30 वा. सु. अश्विनी हॉस्पीटल सोलापुर येथे दाखल केले तेथे त्याचेवर उपचार चालु असताना तो मयत झाला आहे. म्हणुन राजाराम खिमाराम मिना याचे फिर्यादवरुन मुकेश कुय्याराम भिल याचे विरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4

वाशी येथे सासरच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या

पोलीस स्टेशन वाशी :- दिनांक 13.01.19 रोजी 06.00 वा. सु. शिवशक्ती नगर, वाशी ता. वाशी येथे 1) समाधान सहदेव साळुंखे 2) सुरेश सहदेव साळुंखे व दोन महिला सर्व रा. शिवशक्ती नगर, वाशी ता. वाशी यांनी दिपाली समाधान साळुंखे (मयत), हिस हुंडयाचे, मोटारसायकलसाठी, व वेल्डींग गॅरेज साठी तुझ्या वडीलांकडुन पैसे घेवुन ये अशी मागणी करुन दिपाली समाधान साळुंखे (मयत), हिस शारिरीक व मानसीक त्रास दिल्याने त्या त्रासाला कंटाळुन दिपाली समाधान साळुंखे (मयत), हिने स्वता जाळुन घेवुन आत्महत्या केली आहे तिच्या मरणास वरील आरोपी कारणीभुत आहेत. म्हणुन दिपाली समाधान साळुंखे (मयत), हिचे वडील भगवान रावसाहेब पवार रा. चुरमापुरी ता. अंबड जि. जालना यांचे फिर्यादवरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 304(ब),498(अ),323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब येथे मोटारसायकलची चोरी

पोलीस स्टेशन कळंब :- दिनांक 17.01.19 रोजी 19.30 वा. ते 20.00 वा. दरम्यान बाळकृष्ण रामेश्वर गुरसाळे रा. परळी रोड कळंब. यांचे घरासमोर लावलेली हिरो पॅशन एक्स प्रो कंपनीची मोटारसायकल क्र एम एच 25 झेड 9899 जु. वा. किं अं. 25,000/- रु. ची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे म्हणुन बाळकृष्ण रामेश्वर गुरसाळे यांचे फिर्यादवरुन अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब येथे चोरी

पोलीस स्टेशन कळंब :- दिनांक 18.01.19 रोजी 22.00 ते दि. 19.01.19 रोजी 10.00 वा. चे दरम्यान फिर्यादी महिला यांचे जिजाऊ नगर, कळंब येथील पत्रयाचे शेडचा दरवाजा व पत्रे उचकटुन रोख 10,000/- रु. व एक पत्रयाची पेटी जु. वा. कि. अं. 500/- रु असा एकुण 10,500/- रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरुन अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 461 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापुर येथे दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन मारहान

पोलीस स्टेशन तुळजापुर :- दिनांक 19.01.19 रोजी 17.15 वा सु. तुळजाभवानी मंदीर समोर तुळजापुर येथे ज्ञानेश्वर रामचंद्र कंदले रा. तुळजापुर यास गुणवंत हनुमंत दाभाडे रा. तुळजापुर याने मला दारु पिण्यास पैसे का देत नाही म्हणुन डोक्यात दगड मारुन जखमी केले म्हणुन ज्ञानेश्वर रामचंद्र कंदले याचे फिर्यादवरुन गुणवंत हनुमंत दाभाडे याचे विरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापुर येथे भादंविचे कलम 324,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद येथे निशा ब्युटी पार्लर मध्ये चोरी

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 19.01.19 रोजी 13.00 वा. सु. मराठी कन्या प्रशाला समोर यशवंत नगर उस्मानाबाद येथील निशा ब्युटी पार्लर मध्ये चार अनोळखी महिला व लहान मुले यांनी येवुन ब्युटी पार्लर करण्याचा बहाना करुन गोंधळ करुन दोन मोबाईल , दोन कानातील सोन्याचे कर्णफुले 5 ग्रॅम वजनाची, रोख रक्कम 1500/- रु. व घराच्या, कपाटाच्या, मोटारसायकलीच्या चाव्या असा एकुण 37,500/- रु. चा माल चोरुन नेला आहे. म्हणुन दिनकर वसंतराव मुंडे रा. टी. पी. एस. रोड उस्मानाबाद यांचे फिर्यादवरुन अनोळखी चार महिला व लहान मुले यांचे विरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5

तुळजापुर येथे चंदनाचे लाकडाची चोरी व वाहतुक गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन तुळजापुर :- दिनांक 19.01.19 रोजी 18.45 वा. सु. मोतीझरा तांडा, अपसिंगा रोड, तुळजापुर येथे 1) महादेव सुभाष भोसले 2) विकास शांतीलाल पांडागळे दोघे रा. नारी ता. बार्शी यांनी विनापास परवाना अवैदय रित्या चंदनाचे लाकडे तासुन तुकडे करुन कोठुनतरी चोरुन आणुन मोटारसायकलवर घेवुन झाडे तोडण्याचे साहित्यासह- चंदनाचे झाडाचे ओलसर तुकडे एकुण 34 किलो किं अं 1,70,000/- रु. 1 मोटारसायकल जु. वा. किं. अं. 25,000/- रु, झाड तोडण्यासाठी वापरलेले कुऱ्हाड, कुदळ, गिरमीट वगैरे साहित्य किं अं 500/- रु. असा एकुण 1,95,500/- रु चा माल जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापुर येथे भादंविचे कलम 379,34 सह भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(ई)(ग),42,63(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौज मसोबाचीवाडी येथुन म्हैस चोरी

पोलीस स्टेशन येरमाळा :- दिनांक 06.01.19 रोजी सायंकाळी 19.00 ते दिनांक 07/04/2019 रोजी सकाळी 06.00 वा.चे दरम्यान मनोज गोवर्धन कानवले रा.मसोबाचीवाडी यांची एक गावरान म्हैस काळया रंगाची गोल शिंगे असलेली, शेपुट लांब तीन वेत झालेली किं.अं. 40,000/- रु.ची म्हैस मौजे मसोबाची वाडी शेत गट नं. 46 मध्ये गोठयातुन म्हैस बांधलेला दोर कापून कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेली होती ती म्हैस पोलीस ठाणे येरमाळा येथे मिळुन आल्याचे समजले वरून मनोज गोवर्धन कानवले यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरुटयाविरुध्द दिनांक 20/01/2019 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिराढोण येथे चोरी

पोलीस स्टेशन शिराढोण :- दिनांक 18.01.19 रोजी रात्री 23.30 ते दिनांक 19/01/2019 रोजी पहाटे 05.00 वा.चे.दरम्यान शिराढोण येथे महेबुब आब्बास सय्यद रा.शिराढोण यांचे घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात घुसुन कपाटातील रोख 4000/- रुपये, मोबाईल व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 41,200/- रु.चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेला आहे. म्हणून महेबुब आब्बास सय्यद यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 20/01/2019 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे भादंविचे कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे पोहणेर येथे किरकोळ कारणावरून मारहान

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :- दिनांक 19.01.19 रोजी सायंकाळी 06.00 वा.सु. नारायण बाबु धावारे व त्यांचा मित्र असे मिळुन गावातील मसनवाटयाजवळ बसले असताना 1) संदिप अर्जुन अडगळे 2) अर्जुन बाबु अडगळे दोघे रा.पोहणेर ता.जि.उस्मानाबाद 3) पिंटु कांबळे रा.मुंबई यांनी संगणमत करून नारायण धावारे यास विनाकारण शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांडयाने मारून मुक्का मार दिला व अर्जुन अडगळे याने नारायण धावारे यांच्या डाव्याकानावर काहीतरी मारल्याने ते जखमी झाले आहेत. म्हणून नारायण बाबु धावारे यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 20/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे भादंविचे कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6

तुळजापूर येथे रात्रीच्या वेळी संशयीत स्थितीत फिरत असल्याने गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 20.01.19 रोजी 01.00 वा.सु. प्रकाश उदाजी चनुरवार रा.आष्टी ता.चामुर्शी जि.गडचिरोली हा तुळजापूर शहरातील नवीन बस स्टँन्ड समोरील हॉटेल क्रांतीजवळ रोडवर अंधाराचा फायदा घेवून ओलसावलीत स्वत:चे अस्तित्व लपवून काहीतरी मालाविषयी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असताना मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 20/01/2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे म.पो.का.चे कलम 122(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोहणेर येथे गर्दी मारीमारीचा गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :- दिनांक 19.01.19 रोजी रात्री 08.00 वा.सु. पोहणेर येथे संदिप अर्जुन आडगळे रा.पोहणेर हे घरी असताना पोहणेर येथील कैलास नारायण धावारे, नारायण बाबु धावारे, अशिष मेसा धावारे , बाळासाहेब दशरथ धावारे, सागर सतिश धावारे, अश्लेष मेसा धावारे व एक महिला सर्व रा.पोहणेर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी संदिप याचे घरात घुसून तु पोलीसांना आम्ही डाव खेळतो असे का सांगतोस या कारणावरून फिर्यादीस व त्याची आई , वडील व भावास शिवीगाळ करून चापटाने व लाथाबुक्याने मारहान करून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी वरिल लोकांविरुध्द दिनांक 19/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद ग्रामीण येथे भादंविचे कलम 452,143,147,323, 504,506 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.