मेळघाटातील आगडोंबाच्या तपासासाठी वनविभागाचे कोम्बिंग ऑपरेशन

0
834
Google search engine
Google search engine

ड्रोन द्वारे बेपत्ता लोकांचा शोध

सर्च ऑपरेशन मध्ये 29 बाईक जप्त

अकोट/ ता. प्रतिनिधी

मंगळवारी 22 जाने.ला मेळघाटात उद्भवलेली संघर्ष परीस्थीती आता नियंत्रणात असली तरी बेपत्ता ग्रामस्तांमुळं पुनर्वसितांची काळजी वाढली असल्याचे चित्र मेळघाट परीसरात आहे.पुनर्वसित ग्रामस्थ व वनविभाग तथा राज्य राखीव दल (SRP) कर्मचाऱ्यांच्या मेळघाटातील सशस्त्र संघर्षाच्या परीस्थीतीच्या पार्श्वभुमिवर काल गुरुवारी वनविभागाने जंगलात कोम्बिंग ऑपरेशन राबवले.या संघर्षात बेपत्ता झालेल्या ग्रामस्थांसह उपद्रव खोरांच्या शोधासाठीचे हे कोम्बिंग ऑपरेशन काल गुरुवारी पूर्ण झाल्याची माहिती आकोट वनविभागाच्या डीएफओ टी.ब्युला.यांनी दिली.

मेळघाटात मंगळवारी झालेल्या सशस्त्र संघर्षात वनविभागासह राज्य राखीव दलाचे पन्नासच्यावर कर्मचारी जखमी झाले होते.तसेच कुरण क्षेत्रावर मोठ्या आगी लावण्यात आल्या होत्या . त्या सर्व उपद्रव करणार्‍यांचा शोध तथा पडताळणीसाठी मेळघाटात वनविभागाने मोठ्या प्रमाणावर काल गुरुवारला कोंबिंग ऑपरेशन राबवले.विशेष म्हणजे ड्रोन द्वारे या कोंम्बिंग ऑपरेशन शिवाय विविध भागात वनविभागाद्वारे सर्च मोहीम राबवल्या ची माहिती यावेळी वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

वनविभागाने या सर्च ऑपरेशन मध्ये मिळालेल्या 29 टू व्हीलर बाइक या ताब्यात घेतल्या आहेत. तसेच या सर्च ऑपरेशन मध्ये जंगलातील आगीतुन वाचलेले सामानही वनविभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान या सर्व संघर्षातील घटनास्थळासह सह विविध ठिकाणी वनविभाग व राज्य राखीव दल SRP च्या दोन कंपन्या बंदोबस्त कामी तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत एकुण 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

तर दुसऱ्या बाजूने या संघर्षात काही पुनर्वसित ग्रामस्थ ही जखमी झाले असून यातील एका गंभीर जखमी ला अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींनी खासगी उपचार घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यातील बेपत्ता ग्रामस्थांन बद्दल पुनर्वसित गावांमध्ये काळजी व्यक्त केल्या जात असून मेळघाटातील संघर्षाबद्दल पुनर्वसित ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. एकंदरीतच या संघर्षातून उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत असलं तरी बेपत्ता ग्रामस्थांच्या प्रभावामुळे परिस्थिती तणावाखाली दिसत आहे.