मी शून्यावर बाद होणारी खेळाडू नाही; ना. पंकजाताई मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

0
899
Google search engine
Google search engine

राष्ट्रवादी कडून बीड जिल्हांत विकासकामे शून्य -ना. पंकजाताई मुंडे

प्रतिनिधी- दिपक गित्ते

बीड : काही दिवसांपूर्वी परळी येथे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानकडून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी,धनंजय मुंडे ओपनिंगला मैदानात उतरत आपण पहिल्याच बाॅलला विकेट घेणार असल्याचे म्हणत नाव न घेता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टिका केली होती.परंतु,या क्रिकेट मॅचमध्ये धनंजय मुंडेंना शून्यावर बाद होऊन माघारी परतावे लागले होते.

याच टिकेचा जोरदार समाचार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून घेण्यात आला आहे.त्या घाटनांदूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.त्या बोलताना म्हणाल्या की,एकेकाळी ज्या बीड जिल्ह्यांमध्ये 6 आमदारांपैकी पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते.तसेच जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती, तरी जिल्ह्यात कोणताही विकासाचे काम झाले नाही.मात्र,आम्ही विकासाचे काम करतो आणि आमच्या भावांना मात्र तोडपाणी करण्याचे काम असते.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांचे आजही नाव निघाले तर देशातले अख्खे राजकारण ढवळून जाते. त्यामुळे,साहेबांच्या नावाचे राजकारण करणाऱ्यांच्या मागे जायचे नाही तर मुंडे साहेबांचे नाव जिवंत ठेवणाऱ्यांच्या मागे उभे राहायाचे.मला गोपीनाथ मुंडेनी मैदानी खेळ सुद्धा कसे खेळावे लागतात हे सांगितले आहे.त्यामुळे,मी शून्यावर बाद होणारा खेळाडू नाहीये.असा टोला पंकजा मुंडेंनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लगावला आहे.