आकोट तालुका सॉफ्टबॉल लीगचे थाटात समापन

0
695

आकोट/ ता.प्रतीनीधी
देशपांडे अकादमी ऑफ स्पोर्ट्स अकोट तर्फे आयोजित प्रजासत्ताक सॉफ्टबॉल स्पर्धा २०१९ लिग ही दि.२६ व २७ जानेला.आर्यन मैदान , पोपटखेड रोड अकोट येथे पार पडली , या स्पर्धेत अकोट शहरातून एकुण ६६ सॉफ्टबॉल खेळडूंनी भाग घेऊन स्पर्धेचे आकर्षण वाढ़वले ,

अकोट क्रिड़ा क्षेत्रातील प्रशिक्षक मुकुल देशपांडे सुद्धा या स्पर्धेत खेळलेत , त्यांच्या सह लीग मध्ये वरिष्ठ खेळाडू अमन अग्रवाल , अनुराग सुरत्ने , सागर काकड़ , सुजय कल्पेकर , विकास वानखड़े , शुभम देशपांडे व अक्षय गावंडे यांनी सहभाग घेत आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्यात

लीगचा अंतिम सामना आस्की किड्स संघ आणि कृषी संघात खेळला गेला या रोमहर्षक सामन्यात आस्की संघाने ५-४ होमरन चा फरकाने बाजी मारली
या लीग चा उत्कृष्ट पिचर म्हणून आस्की चा तेजस मोडोकार व इमर्जिंग प्लेयर म्हणून कृषि संघचा परिमल धर्मे ला निवड करण्यात आले.