उस्मानाबादेत सेनेला खिंडार ; काँग्रेसला अच्छे दिन

0
2604
Google search engine
Google search engine

तेर येथील शिवसेनेचे युवा नेते पृथ्वीराज आंधळे यांचा काँग्रेस पक्षाच्या प्रवेश शिव सेनेला खिंडार

उस्मानाबाद – काँग्रेस चे चाणक्य व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महासचिव अहमद पटेल यांनी तेर येथील शिव सेनेचे युवा कार्यकरते प्रथ्वीराज आंधळे यांना पक्ष प्रवेश देऊन स्वागत केले या वेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर ,राम पेंढारकर,गोकुळ चे चेअरमन दिलीप माने पाटील उस्मानाबाद पंचायत समिती चे माजी सदस्य बाबुराव नाईकवाडी हे उपस्थित होते हस्ते .तेर ता जी उस्मानाबाद येथील शिव सेने चे धडाडीचे निष्टवंत युवा कार्यकर्ते होते ते माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबालकर व सतीश सोमाणी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते परंतु सद्याच्या व्यापारीकरण राजकीय कार्यकर्ते व नेते यांची अर्थकारणाशी सांगड असल्याने त्यांच्या निष्ठेला किंमत उरली नसल्याने सतत अन्याय होत असल्याचे लक्ष्यात येऊन पक्षश्रेष्ठीं ना बोलून ही काही ही उपयोग होत नाही त्या मुळे श्री आंधळे यांनी आपल्या सहकार्यासोबत काँग्रेस पक्षाच्या प्रवेश घेतला आहे अवघ्या वीस वर्षांत थेट दिल्ली गाठून पक्ष प्रवेश केला असल्यांने उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत .तेर परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ला सतत विरोध करून शिवसेनेची राजकीय ताकत वाढवण्यासाठी पृथ्वीराज आंधळे यांनी परिश्रम घेतले आहेत या परिसरामध्ये आत्ता काँग्रेस ची ताकद नक्कीच वाढेल व विधानसभा निवडणुकीत जेष्ठ नेते आमदार मधुकरराव चव्हाण याना मोठा फायदा होईल असे मानले जाते