आकोटात “मधुमेह समज व गैरसमज” व्याख्यानाचे   आयोजन

0
649
Google search engine
Google search engine

अकोट/ता.प्रतिनिधी
मधुमेह मुक्त भारत अभियाना डॉ रवींद्र नांदेडकर(पुणे) यांच्या व्याख्यानाचे आयोजन अकोट शहरात करण्यात आले आहे,
डॉ रविंद्र नांदेडकर यांच्या व्याख्यानमालेचा कार्यक्रम दिनांक ३ फेब्रुवारी रोजी स्थानिक दर्यापूर रोड स्थित “राज मंगल कार्यालय” येथे दुपारी ४ ते ७ पर्यंत करण्यात आले आहे, डॉ रविंद्र नांदेडकर यांना मधुमेह संशोधन मध्ये अनुभव असून अकोट वसीयांसाठी “मिशन डायबिटीज फ्री इंडिया”या कार्यक्रमा अंतर्गत लोकांना निःशुल्क व्याख्यानाचा लाभ घेता येईल,
व्याख्यानमालेत
मधुमेह म्हणजे काय?,तो कसा होतो
मधुमेह पूर्व अवस्था ,मधुमेह होण्यापूर्वीची लक्षणे,मधुमेहावरील चिकित्सा,मधुमेहाची कारणे, इन्सुलिनचे कार्य,।मधुमेहाचे प्रकार, गर्भावस्थाजन्य मधुमेह(गॅस्टेशनल डायबिटिज),मधुमेहातील पथ्थ (आहार) आणि नियोजन , मधुमेह आणि करायचे व्यायाम,मधुमेह होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, आदी विषयावर मार्गदर्शक होणार असून नागरिकांनी अधिकाधीक संख्येने कार्यक्रमाला हजर राहावे असे आवाहन आयोजक संतोष मिसळे, पंकज गोरडे,अशोक चौधरी माजी कृषी अधिकारी अकोट यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.