जेसीआय अकोट व सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या विद्यमाने रक्तदान शिबिर

0
1098
Google search engine
Google search engine

आकोट/ता.प्रतीनिधी
जेसीआय अकोट व सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या विद्यमाने 27 जानेवारी रोजी शहरात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात म् महिला जेसीरेट यांनी देखील रक्त दान केले. तसेच यावेळी शहरातील ५३ जणांनी रक्त दान केले .
कार्यक्रमाचे उदघाटक डाॅ सचिन लोखंडे प्रमुख अतिथी जेसी अशोक गट्टाणी अध्यक्ष जेसी निलेश हाडोळे सह सचिव राहुल शेगोकार प्रकल्प अधिकारी जेसी पवन बोरोडे प्रकल्प प्रमुख जेसी स्मित संजय पवार सह प्रकल्प प्रमुख जेसी प्रतिक गोरे व सर्व जेसी परिवाराची उपस्थिती होती.

रक्त दान शिबीरात अध्यक्ष जेसी निलेश हाडोळे व प्रथम महिला जेसीरेट ममता हाडोळे , जेसी नंदकिशोरजी शेगोकार, लालाजी भंडारी, डाॅ अरविंद मोडक ,अनुप गव्हाणे, जेसीरेट गव्हाणे, जेसीरेट डाॅ सोनल व्यवहारे, विनोद कडु अनिकेत मिरकुटे, सचिन राठी, स्मित पवार आदी सर्वांनी रक्त दान केले.
शिबीराला डाॅ बी पी ठाकरे ब्लड बँकेचे विषेश सहकार्य लाभले.या शिबिरात 53 रक्त बाॅटल जमा करण्यात आले. रक्त दान शिबिर करिता जेसी सागर बोरोडे ,डाॅ रोहितजी व्यवहारे, जेसीरेट डाॅ सोनल व्यवहारे , डाॅ अरविंद मोडक ,जेसी JFP नंदकिशोर शेगोकार यांचे विषेश सहकार्य लाभले. असे जेसी निलेश इंगळे यांनी कळविले .