श्रमसंस्कारातुन तकदीर लिहणारा डोळसांना लाजवणारा लढवय्या तकदीर खान

0
754
Google search engine
Google search engine

डोळसांना लाजवेल असा लढवय्या कारागीर

अकोट/ ता.प्रतिनिधी

डोळ्यांनी दिसत नाही व कानाने ऐकायला येत नाही.मात्र जगण्यात डोळसपणा असा की धडधाकटांनाही लाजवेल शहरातील धारोळी वेस परीसरात राहनारे तकदीर खान कलीम खान ….वय ४२ वर्ष …जन्मापासून दिसत नाही …कानाने एकु येत नाही… बरोबर बोलता येत नाही …मात्र या अवस्थेत ही कर्म हीच पुजा…अन श्रम हाच ईश्वर… असल्याचं त्यांनी आपल्या कार्याने जगाला दाखवुन दिलं आहे.

मोटर वाहनाचे हॉर्न दुरुस्ती करण्याचे कसब त्यांनी जोपासले आहे तकदीर खान २००३ पासून एअर हॉर्न सोडून इतर सर्व हार्न बरोबर दुरुस्ती करीतात. ते जिप ट्रेक्टर ट्रॕव्हल्स ऑटो असे विविध प्रकारचे वाहनांचे हार्न दुरुस्ती करण्यात माहीर आहेत.

मोटार लाइन मध्ये सुद्धा ते हॉर्न दुरुस्ती साठी काम करतात एका हॉर्नसाठी ते साधारणतः दुरुस्ती साठी ५० ते ६० रुपए घेतात त्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नसून राजीव गांधी योजना मधून १८ वर्षापासून ५०० रूपये रुपए अनुदान मिळत होते.मात्र सध्या ते बंद असल्याचं ते सांगतात. शासनाकडून कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही अकोट मधून सर्व हिन्दू मुस्लिम बांधावांमध्ये ते सुप्रसिध्द आहे

.जिल्ह्याच नव्हे महाराष्ट्रात असा एकमेव माणूस असावा जो डोळे व कानाने ऐकु येत नसतांना अचुक काम करतो.त्यांची प्रेरणा घेवून अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच शासनाने पण त्यांची कार्याची व हालाखीची परिस्तिथिचि दखल घेवून शासकीय योजनेचा लाभ द्यावा तसेच नागरीकांनीही त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे.