भोसलेकालीन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आकोटात भक्तांच्या रांगा- राजे संग्रामसिंह भोसले यांची विशेष उपस्थिती

0
1102
Google search engine
Google search engine

गणेश जयंती हर्षोल्हासात साजरी

अकोट/संतोष विणके

अकोट शहरातील सोमवार वेस येथील पुरातन भोसलेकालीन श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. शहरातील भोसलेकालीन सिद्धिविनायक मंदिर हे ऐतिहासिक व पुरातन असून नागपूर गादीचे रघुजी राजे भोसले यांनी बांधल्याची आख्यायिका आहे निजामाच्या हल्ल्यातुन अकोट येथिल सोमवार वेसीतील हत्तीखान्यातील आश्रयामुळं रघुजी राजे भोसले यांचा जिव वाचल्याने त्यांनी सिद्धिविनायक मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. विशेष म्हणजे या वर्षी विदर्भातील या पुरातन गणेश मंदिरात दर्शनासाठी नागपूर येथील राजे संग्रामसिंह भोसले यांची विशेष उपस्थिती होती .यावेळी गणेश जयंती निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळी अभिषेक मंत्र पठण गणेश पूजा विधी पार पडली तर संध्याकाळी महाआरती व त्यानंतर भव्य महाप्रसाद पार पडला.

महाआरतीच्या मुख्य कार्यक्रमाला राजे श्री संग्रामसिंह भोसले (नागपूर) यांच्यासह ठाणेदार श्री संतोष महल्ले,ॲड श्री महेश गणगणे,डॉ.श्री तरुण राठी,श्री अरविंद गणोरकर,मिलींद झाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी दर्शनासाठी हजारो गणेश भक्तांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या तर भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.