दुख:रूपी संसार भगवंतच पार करून देऊ शकतो – ह. भ. प. कल्पनाताई ठाकूर >< घुईखेड येथे समाधी महोत्सव

0
752
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
संसारामध्ये खुप दु:ख आहे. संसार हा दुख:लय आहे म्हणजेच दु:खाचा सागरच आहे. या संसाराला तरूण जाण्यासाठी नावाड्याची गरज आहे. आणि हा दुख:रूपी संसारसागर फक्त आणि फक्त भगवंतच पार करून देऊ शकतो असे प्रतिपादन आळंदीकर ह. भ. प. कल्पनाताई ठाकुर यांनी केले. त्यांनी संत श्रेष्ठ बेंडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शनिवारी प्रवचन दिले.
 पुढे प्रवचनात त्यांनी म्हटले की, संसार रूपी सागर तरूण जाण्यासाठी जी नाव त्या नावेचा नावाडी म्हणजेच संत आहे. देवंच या संतांची अवतार घेऊन या भुतलावर जडजीवांचा उध्दार करण्यासाठी येत असतो असेही कल्पनाताई ठाकुन यांनी यावेळी म्हटले. यानंतर यामध्ये ब्राम्हणाची कथा प्रवचनामध्ये सांगण्यात आली. तसेच दुपारच्या सत्रात गजेंद्र मोक्ष समुद्र मंथनाची कथा सांगण्यात आली. या भागवतादरम्यान शनिवारी मारोतराव ठाणेकर, तुळशीराम ठाणेकर, हरिभाऊ ठाणेकर यांनी अन्नदान केले.