चांदुर बाजार पोलीसानी अवैध गौमाश विक्री करणाऱ्या अटक तर पाच गौवंश याना दिले जीवदान दोन आरोपी याना अटक

0
806

चांदुर बाजार पोलीसानी अवैध गौमाश विक्री करणाऱ्या अटक
तर पाच गौवंश याना दिले जीवदान दोन आरोपी याना अटक

चांदुर बाजार //प्रतिनिधी
मागील काही महिन्यांपूर्वी पासून बंद असलेली अवैध जनावर आणि गौमाश विक्री पुन्हा जोरात सुरू झाल्याची दिसते.होत असलेल्या अवैध गौमाश आणि जनावर कत्तली ची माहिती चांदुर बाजार पोलीस स्टेशन चे टाऊन इंचार्ज दिलीप नादुरकर आणि त्यांच्या टीम ला होताच त्यांनी स्थनीक कसाब पुरा येथील आरोपी:-अब्बास अहमद बशीर अहमद वय 22 वर्ष याच्या राहत्या घरी छापा टाकला असताना त्यांना त्याच्याकडून 120 किलो गौमाश आणि कत्तलीसाठी उपयोगात येणारे साहित्य अशा एकूण 24 हजार 400 रुपये चा मुद्देमाल जप्त केला.या कार्यवाही मध्ये आरोपी वर प्राणी संरक्षण अधिनियम, भादवी अंतर्गत अनेक गुन्हची नोंद करण्यात आली.
तर स्थानिक कसाब पुरा येथील रहिवासी असलेल्या आरोपी:-अब्बास अहमद बशीर अहमद वय 32 वर्ष याच्या कडून पोलिसांनी 5 जिवंत गौवंश जप्त करण्यात आले.पोलिसांच्या या कार्यवाही मुळे त्या गौवंश याचे प्राण वाचले यामध्ये सुध्दा आरोपीला अटक करून त्याच्या विविध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
गौवंश यांची महर्षी गौरक्षण येथे पाठविण्यात आले.
वरील दोन्ही कार्यवाही ठाणेदार अजय आकरे याच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे,पोलीस उपनिरीक्षक वासनिक मैडम,टाऊन बिट जमादार दिलीप नादुरकर,कासदेकर,निकेश नशीबकर आणि त्यांच्या टीम ने केली.

बॉक्स
“पोलीस यांच्या या कार्यवाही मुळे आणि ब्राम्हणवाडा थडी अमरावती ,वरुड,नांदगाव येथील अवैध जनावर तस्करी वरून मध्यप्रदेश मधून महाराष्ट्र त होणारी अवैध जनावर तस्करी जोरात सुरू झाली असल्याचे बोलले जात आहे.”

फोटो:- मेल केले आहे