*आजपासून जगदंब पब्लिक स्कूलच्या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात बहारदार कार्यक्रम चे आयोजन; सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, अक्षदा सावंत ची संगीत मैफिल सह सिंधुताई सपकाळ व नीता माळी चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.*

0
1115
Google search engine
Google search engine

 

जगदंब पब्लिक स्कूलच्या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात बहारदार कार्यक्रम चे आयोजन; सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, अक्षदा सावंत ची संगीत मैफिल सह सिंधुताई सपकाळ व नीता माळी चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चांदूर बाजार — तालुक्यातील मुक्ताई बहुद्देशीय संस्था चांदुर बाजार द्वारा संचालित जगदंब पब्लिक स्कूल मध्ये दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिकांची सुरेंल मैफिल सह प्रसिध्द लेखिका नीता माळी पालकांशी हितजुग साधणार आहे. यासोबतच अनाथांची माय सिधुताई सपकाळ याचे उद्बोधन होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील एकमेव केंद्रीय शिक्षण प्रणाली प्रमाणित जगदंब पब्लिक शाळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आ बच्चू कडू यांच्या हस्ते होणार असून तहसीलदार राजेश चौहान, ठाणेदार अजय आखरे, नगराध्यक्ष रवींद्र पवार, माजी महापौर विलास इंगोले, नगरसेवक दिनेश बूब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत व कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम अक्षदा सावंत यांचा संगीताची सुरेल मैफिल बहरणार आहे.
यासोबतच १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता ठाणे येथील सुप्रसिद्ध लेखिका नीता माळी ” उद्याचा सुंदर पिढीसाठी ” या विषयावर उपस्थित पालकांसोबत हितजुग साधणार आहे. याचसोबत सायंकाळी ५ वाजता अनाथांची माय सिंधुताई सपकाळ याचे आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांन करिता मोलाचे उद्बोधन होणार आहे.
यामुळे जगदंब पब्लिक स्कूल च्या यावर्षीच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाला वेगळीच पर्वणी चढणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने स्नेहसंमेलनला हजेरी लावावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विनोद कोरडे सह मनोज कटारिया, नगरसेवक नितीन कोरडे , संगीता चर्हाटे, अतुल चर्हाटे ,दत्ता देशमुख,उदय देशमुख व मनीष एकलारे यांनी केले आहे.