सावंगा येथील प्रशिक्षण केंद्रावर नरखेड तालुक्यातील नागरिकांचे होत आहे मनसंधारण ! पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांची जल संधारणाकडे वाटचाल !   दुष्काळमुक्तीसाठी सुरू झाली जलसंधारणाची चळवळ ! 

0
929
Google search engine
Google search engine

सावंगा येथील प्रशिक्षण केंद्रावर नरखेड तालुक्यातील नागरिकांचे होत आहे मनसंधारण !

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांची जल संधारणाकडे वाटचाल !

पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

दुष्काळमुक्तीसाठी सुरू झाली जलसंधारणाची चळवळ !

नरखेड तालुका प्रतिनिधी /

वरुड तालुक्यातील सावंगा येथील प्रशिक्षण केंद्रावर नरखेड तालुक्यातिल सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या ९७ गावातील नागरिकांना प्रशिक्षित करण्याचे काम पाणी फाउंडेशन तर्फे होत आहे नरखेड तालुक्यातील सर्वच प्रशिक्षणार्थ्यांना विशेष असे प्रशिक्षण देण्याचे मोलाचे कार्य अमरावती जिल्ह्यातील सावंगा येथील मॉडेल प्रशिक्षण केंद्रावर पाणी फाउंडेशनच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून होतांना दिसत आहे . तालुक्यातील सर्वच प्रशिक्षणार्थ्यांना चार दिवसीय निवासी विशेष प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रातील भीषण पाणी समस्या निकाली काढून आपले गाव पाणीदार करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना पानलोटांचे उपचार कसे व कुठे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन करून , माती परीक्षण , शोष खड्डे , आग पेटी मुक्त शिवार , जल बचतीचे कार्य , सेंद्रिय शेती , जलसंधारनासह , मनसंधारण , यासह खेळांच्या माध्यमातून बौद्धिक ज्ञान , यासह विशेष महत्वाच्या विषयांवर पाणी फाउंडेशन ची तज्ञ प्रशिक्षक मंडळी मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम करीत आहे .

महाराष्ट्र राज्यात लोकसहभागातून पाणलोट आणि जलसंधारणाची मोठी चळवळ उभी करण्यात यशस्वी ठरलेल्या अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा या वर्षी राज्यातील ७६ तालुक्यांत घेतली जाणार आहे. वाॅटर कप स्पर्धेच्या चवथ्या टप्प्यात (२०१९ ) राज्यातील हजारो गावांना दुष्काळमुक्तीची संधी उपलब्ध हाेणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील ७६ तालुक्यांचा समावेश आहे .

‘पाणी फाऊंडेशन’ हे पाणीटंचाई प्रश्न सोडविण्यासाठी गावागावात लोकांना प्रोत्साहित करून मृद व जलसंधारण, पाणलोट व्यवस्थापनाची शास्रशुद्ध पद्धत, उत्तम कामगिरी करण्यासाठी आणि विषयातील विज्ञानात लोकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. त्यातून गाव, तालुका टँकरमुक्त करणे, जलसंधारण कामाची लोकचळवळ, गावाच्या विविध प्रश्नांवर काम करणा-या सेवाभावी संस्था, लोक सहभागातून उभी केली आहे. स्पर्धेच्या काळात जलसंधारण, आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या गावांसाठी ही स्पर्धा असून याची आतापासून नरखेड तालुक्यातील सर्व गावे जोमाने तयारीला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्यक्ष स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे २०१९ दरम्यान असणार आहे. यात नरखेड तालुक्यातील ९७ गावांनी सहभाग नोंदवला आहे . सिने अभिनेता आमिर खान, किरण राव , सत्यजित भटकळ , डॉ अविनाश पोळ , व पाणी फाउंडेशन टीम यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या उपक्रमाबाबत नरखेड तालुक्याला उत्सुकता लागली आहे. या ९७ गावातील प्रशिक्षणार्थ्यांना आयोजित प्रशिक्षणामध्ये पाणी फाउंडेशन ची तज्ञ मंडळी मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत आहेत.

नरखेड तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सावंगा येथील ट्रेनिंग सेंटरवर प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले जात आहे , त्यांना प्रोत्साहित करून मार्गदर्शन करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अंकुश केदार , उप विभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर , , नरखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दयाराम राठोड , तहसीलदार शेखर पुनसे , वन परिक्षेत्र अधिकारी बोलके साहेब , तालुका कृषी अधिकारी आटे साहेब , अभियंता सिंचन विभाग , करीत आहे .

नरखेड तालुक्यातील खापरी केने , खैरगाव , दिंदरगाव , हिवरमठ , कारांजोली , रामपुरी , उदापुर , बानोरचंद्र , या आठ गावातील ४४ प्रशिक्षणार्थ्यांची दुसरी ब्याच प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आली त्यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण सभापती उकेश चव्हाण , प्राचार्य धोटे सर , मनीष केने , मनोज खुटाटे , मनोज वर्मा , सुनील कोरडे , पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे, भूषण सूर्यवंशी यांच्यासह आदी गावातील सरपंच व गावकऱ्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून बस ला हिरवी झंडी दाखवून प्रशिक्षणाला पाठविण्यात आले .

या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम सावंगा येथील प्रशिक्षण केंद्रावरील पाणी फाउंडेशन ची तज्ञ प्रशिक्षक मंडळी नयन गावंडे , प्रणिता खुजे , शेषराव राठोड , अजय पाचारे , प्रज्वल टापरे , रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , भूषण सूर्यवंशी यांच्यासह आदी प्रशिक्षक मंडळी करीत असून सर्व प्रशिक्षणार्थ्यांची जल संधारणाकडून मन संधारणाकडे वाटचाल होत असल्याचे चित्र नरखेड तालुक्यात दिसत आहे हे विशेष !