लोकजागर मंचच्या युवाशक्ती राष्ट्रशक्ती व्याख्यानास अकोटवासी यांचा प्रतिसाद

0
761
Google search engine
Google search engine

आकोट/ ता.प्रतीनीधी

लोकजागर मंच द्वारा आयोजित प्रा. वसंत हंकारे यांचे युवाशक्ती राष्ट्रशक्ती या व्याख्यानास अकोट वासी यांनी जोरदार प्रतिसाद दिला व्याख्यानाने तरुणांच्या. अंतरंगात राष्ट्रवादी विचारांचा वणवा पेटवला. स्थानिक राजमंगलम लॉन येथे लोकजागर मंच द्वारा प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी युवाशक्ती राष्ट्रशक्ती या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली यावेळी मंचावर लोकजागर चे अध्यक्ष अनिल गावंडे सुधाकर खुमकर, पुरुषोत्तम आवारे श्रीकांत पागृत ,गजानन बोरोकार अनंत सपकाळ यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सुधाकर खुमकर यांनी केले तर पुरुषोत्तम आवारे यांनी लोकजागरच्या कार्यावर प्रकाश टाकला तर संस्थापक अनिल गावंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन लोकजागरच्या लोककल्याणकारी उपक्रमाची मालिका यापुढे ही सुरू राहणार असल्याचे सूचित केले.

यानंतर अकोट शहर व परिसरातील दिव्यांग गिर्यारोहक धिरज कळसाईत याने किलोमांजरो शिखर सरृ केल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच तालुक्याचे सुपुत्र चंद्रशेखर बाहाकार यांना महाप्रशासक झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगीदोन्ही सत्कारमुर्तीनी प्रतिकूल परिस्थितीतही यशासाठी लढत राहण्याचा सल्ला दिला व

यानंतर प्रा.हंकारे यांच्या व्याख्यानाची सुरुवात झाली. आपल्या व्याख्यानात त्यांनी मिश्किल विनोदी तथा गंभीर प्रसंगाचे कथन करत श्रोत्यांना राष्ट्रभक्ती बाबत अंतर्मुख केले यावेळी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी लढा देणाऱ्या भारतातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमा सिन्हा यांच्या बाबत प्रेरक प्रसंग व्यक्त केला व माणूस म्हणून जगण्याचे त्यांचे मर्म सांगितले. या व्याख्यानास शेवटपर्यंत महिला पुरुष ,युवा वर्ग खिळून होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.अनंत सपकाळ यांनी मानले