विदर्भ माऊलीचा रस्ता रोखणारे शुक्राचार्य कोण…?

0
982
Google search engine
Google search engine

कुणाच्या सत्तेत सुटेल महाराजांच्या मार्गाचा वनवास

मागील दहा वर्षापासून ७०० कोटी चा विकासआराखडा सुरू आहे ,पण विटंबना पहा ज्या संत गजानन महाराजांच्या नावाखाली शासनाने हा विकास आराखडा मंजूर केला त्यांच्या पालखीचा मार्ग आजही विकासापासून वंचित आहे .
कसाबसा या मार्गाचा वनवास संपला असं वाटत होतं पण त्यातच काही शुक्राचार्यांनी 18 मीटरचा रस्ता 15 मीटर वर आणला त्यातही त्यांचे समाधान झाले नाही तर १२ मीटर वर आणला एवढे होऊनही त्यांचं मन समाधानी नाही राहिलं तर काही लोक कोर्टाची पायरी चढण्यास रस्त्याचे काम अडवण्यात आपली धन्यता समजू लागले येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक याच मार्गाने जाईल पण पहा महाराष्ट्राचे दैवत ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला तेही कसे जातील या मार्गाने हे समजेना पण कोणीच या मार्गाच्या शुक्राचार्यांना काहीच बोलत नाही. काय हीच त्यांची मावळे गिरी,
तर दुसरीकडे 25 फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रगट दिन पण असं वाटत नाही या रस्त्याच्या विकासातील शुक्राचार्य आपल्या स्वार्थासाठी हा मार्ग तोपर्यंत पूर्ण करू देतील .
या मार्गावर अमरावतीचे आयुक्त, जिल्ह्याचे कलेक्टर, नगरपरिषदचे मुख्याधिकारी, सत्तेतील नेते मंत्री, इतकेच नव्हे तर विरोधातील नेते, सुद्धा फिरून जातात गजानन महाराजांच्या नावाखाली मते मागतात आपल्या राजनीतीची भाकरी शेकून घेतात पण पुढे काय, एक तर स्वतहाच शुक्राचार्य होतात किंवा असलेल्या शुक्राचार्यांची मदत करतात किती विटंबना आहे की या रस्त्याचा ठेकेदार काम मधातच सोडून चालला जातो आणि कोणीच काही बोलत नाही न्यायालय व जनता यांच्या मधातिल न्यायालयीन मित्र फिरदोस मिर्झा हे फिरून देखील पाहत नाही तर 90 टक्के लोकांना फिरदोस मिर्झा कोण हाही मोठा प्रश्न पडतो म्हणजे त्यांना फिरदोस मिर्झा कधीही बघितलेला नाही किंवा ऐकलेला ही नाही मग अशे मित्र असल्यापेक्षा *दिलदार शत्रू बरा नाही का* हे म्हणणे वावगे ठरणार नाही शिवाय येथे न्यायालयाची अवमानना होताना दिसते जेव्हा आयुक्त साहेबांची मीटिंग असते त्याच वेळी अधिकारी येतात नझुल ऑफिसची सर्व यंत्रणा घेऊन रस्त्यावर मोजमाप फक्त दाखवण्यासाठी तयार राहते थोतांड म्हणून मोजमाप करतात पण त्यानंतर जैसे थे या रस्त्याचे जवळजवळ ०६ वेळा मोजमाप झाले तेही शासनाच्या अधिकाऱ्यांनी केली पण चुकतय कुठं आणि कोणाच हे अजूनही जनतेला व न्यायालयाला समजून राहुल नाही म्हणुन हेही शोधणे महत्त्वाचे आहे कारण प्रमुख पालखी मार्गाचे विकासात अजूनही लपलेले शुक्राचार्य शोधून न्यायालयाला त्यांना चोप म्हणजेच तांबी लावावी लागेल आणि तेव्हा कुठे महाराजांच्या या प्रमुख पालखी मार्गाच्या विकासातिल झरींच्या शुक्रचार्याना दंडित कराता येल
आता तर जनता गजानन भक्त हेच म्हणत आहे कि न्यायालयाने स्वतहा या मर्गाकरीता टोकाची भुमिका घ्यावी म्हणजे या मार्गाचा १० वर्षा चा वनवास संपेल आणी खरच या मार्गाला अच्छे दिन येतिल का…?