मागासवर्गीय कर्मचार्‍यांना पदोन्नतीचे आरक्षण लागू करा

0
651
Google search engine
Google search engine

मागासवर्गीय कर्मचार्‍यांना पदोन्नतीचे आरक्षण लागू करा

उस्मानाबाद / प्रतिनिधी – 26 फेब्रुवारीला मुंबईत राज्यव्यापी रॅली
जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचार्‍यांनी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन
उस्मानाबाद, दि. 14- स्वतंत्र मजदूर युनियनच्यावतीने मागासवर्गीय कर्मचार्‍यांना पदोन्नतीसाठी असणारे आरक्षण लागू करावे यासह अन्य मागण्यांसाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार्‍या रॅलीत सरकारकडे विविध मागण्या करण्यात येणार आहेत. या रॅलीत केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके, एन. बी. जोरांडे, एन. डी. पोटभरे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या शासन यंत्रणेतील विविध विभागात कर्मचार्‍यांना पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्याबाबात सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर 2018 रोजी निर्णय दिला आहे. कर्मचार्‍यांना मागासलेपणा सिध्द करण्याची अट रद्द केल्यानंतर चार महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर राज्य शासनाने राज्यातील लाखो मागासवर्गीय अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. एवढेच नाही तर मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती देणे सुध्दा बंद केले आहे. शासनाच्या या आरक्षणविरोधी भूमिकेमुळे राज्यातील सर्व विभाग, मंडळे, महामंडळे व शासन अंगीकृत विभागातील लाखो कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे पदोन्नतीमधील आरक्षण लागू करणे गरजेचे आहे. या प्रमुख मागणीसाठी काढण्यात येणार्‍या रॅलीत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागातील मागासवर्गीय कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी आगवाने, सचिव बापू जगदे, सिद्दीक मुलानी, विठ्ठल गायके, गौतम मोटे, दत्ता पौळ, सचिन शिंदे, सचिन सगर, निशिकांत संगवे, संजय भांडे, गणेश जमादार, इम्रान शेख, सुदाम ओव्हाळ, डी. बी. घाटेराव, संजय माळाळे, मनोज रूपणवार, महेंद्र शिनगारे आदींनी केले आहे.