बाळापूर तालुक्यातील बहादुरा येथे रेडिओ किसान दिनाचे आयोजन

0
754
Google search engine
Google search engine

अकोला/प्रतीनीधी
बाळापूर तालुक्यातील आदर्श ग्राम बहादुरा येथे आकाशवाणी दारा आयोजित रेडिओ किसान दिनाचे आयोजन उद्या दिनांक 15 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे
प्रसार भारती अकोला आकाशवाणीच्या रेडिओ किसान दिनाच्या कार्यक्रमात कीसान मार्गदर्शन शिबिर व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

ग्राम बहादुरा येथील विठ्ठल माळी यांच्या शेतात पार पडणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर दिलीप मानकर विस्तार संचालक पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रमुख मार्गदर्शक श्री अशोक अमानकर उपजिल्हाधिकारी डॉ.विजय भोजने अकोला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अरुण वाघमारे कृषी उपसंचालक संजय खडसे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सुरेश भारती आयुक्त मत्स्यव्यवसाय अकोला श्री उमेश ठाकरे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला शरद वाळके जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड,अलोक तरेनिया अग्रणी प्रबंधक हे असणार आहेत तरी शेतकरी बांधवांनी या रेडिओ किसान दिनाच्या आयोजनाचा लाभ घेण्याचे आव्हान आकाशवाणीचे कृषी संपर्क अधिकारी सुरज गोळे तथा कार्यक्रम प्रमुख विजय दळवी तसेच केंद्रप्रमुख अकोला आकाशवाणी यांनी केले आहे