ट्रॅक्टर चालकांच्या कौशल्याची अनोखी रिव्हर्स ट्रॕक्टर स्पर्धा

0
669

आकोट/ता.प्रतीनीधी

ट्रॅक्टर चालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व मातीशी घट्ट नाळ जुडलेला शेतकऱ्यांनच्या ट्रॅक्टर चालन कौशल्याला वाव मिळावा म्हणुन तालुक्यातील मारोती महाराज संस्थान पिंप्री खु. येथे अनोख्या रिव्हर्स ट्रॕक्टर ट्रॉली स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.स्पर्धेच्या उद्घाटनाला.बाळासाहेब बोंद्रे ,रणजित पाटिल काळे .मनिष कराळे हे मान्यवर लाभले होते.

स्पर्धेला प्रथम बक्षीस १११११रु .प्रविण ठाकरे यांच्या कडून साहेबराव भगत यांच्या हस्ते स्पर्धक दत्ता पाकधाने यांना प्रदान करण्यात आले,व्दितीय ७१११ रु .बाळकृष्ण बोंद्रे यांच्याकडून स्पर्धक गणेशराव पवार यांना .दिपक भगत व .संदिप मानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले व तृतीय बक्षिस ५१११ .दिपक भगत .शांतारामजी मानकर यांच्या कडून .गोवर्धन बानेरकर यांच्या हस्ते स्पर्धक अमित ढोले यांना प्रदान करण्यात आले

यावेळी आयोजक समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.असे आयोजकांनी कळवले आहे.स्पर्धे दरम्यान डॉ अभय पाटील यांनी भेट देऊन स्पर्धकांचा व गावकऱ्यांचा उत्साह वाढवला.